Sharad Pawar Prabhakar Deshmukh esakal
सातारा

'शरद पवारांच्या घरावरील हल्ला म्हणजे, महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला'

रुपेश कदम

'शरद पवारांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचं पाप करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकविण्यात येईल.'

दहिवडी (सातारा) : खासदार शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरावरील हल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा, संस्कृतीवरचा हल्ला आहे. सरकारनं या हल्ल्यामागील सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (NCP leader Prabhakar Deshmukh) यांनी केलीय. काल खासदार शरद पवार यांच्या घरावर एसटी महामंडळाच्या आंदोलनातील काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दहिवडीत महाविकास आघाडीनं बाजार पटांगण ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव प्रा. कविता म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे व रमेश पाटोळे, नगरसेवक सुरेंद्र मोरे, महेश जाधव, विशाल पोळ, शामराव नाळे, सुभाष नरळे, युवराज सुर्यवंशी, के. डी. भोसले, किशोर सोनवणे, माण-खटाव युवक अध्यक्ष प्रशांत विरकर, अमोल काटकर, सतीश मडके, विष्णुपंत अवघडे, महेंद्र जाधव, अजित पवार, सूर्याजी जगदाळे, रमेश शिंदे, कुमार पोतेकर, अमोल पोळ, वर्षा मोरे, विकास निंबाळकर, नारायण अहिवळे मान्यवर उपस्थित होते.

NCP leader Prabhakar Deshmukh

प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, आम्ही सर्वजण पवार साहेबांच्या पाठीशी ठाम असून पवार साहेबांसाठी कोणताही संघर्ष करण्यास तयार आहोत. डोकी भडकावून अतिशय घाणेरडं काम काल समाजकंटकांनी (ST Workers Strike Maharashtra) केलं. शरद पवार साहेबांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचं पाप करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकविण्यात येईल. शासनानं खोलात जावून या घटनेची शहानिशा करावी. एम. के. भोसले म्हणाले, गुलाल उधळल्यानंतर दुसर्‍या दिवशी करण्यात आलेला हल्ला म्हणजे अपयश लपविण्यासाठी केलेले षडयंत्र आहे. प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी अतिशय लाजिरवाणी अशी कालची घटना आहे. ज्या कोणी ही घटना घडवून आणली त्यांना कठोर शासन व्हावं. किशोर सोनवणे म्हणाले, गोरगरीब, कष्टकरी, दिनदलित, सर्व जातीधर्मातील जनतेला सोबत घेवून जाणाऱ्या पवार साहेबांवरील हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असा त्यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT