सातारा

महाविकास आघाडीत शिवसेनेची फरपट : प्रवीण दरेकर

उमेश बांबरे

सातारा : महाविकास आघाडीच्या सत्तेत असल्याने शिवसेनेला नाईलाजास्तव फरपटत जावे लागत आहे. त्यांची इच्छा आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेची महाविकास आघाडीत असूनही आहे ही जागा गेली, असेही त्यांनी नमूद केले.
 
श्री. दरेकर गुरुवारी सातारा दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका शिवसेना लढविणार आहे. महाविकास आघाडीत असूनही त्यांच्यात एकमत दिसत नाही, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""सध्या शिवसेनेची फरपट झाली असून, नाइलाजास्तव महाविकास आघाडीत सत्तेत असल्याने त्यांना फरपटत जावे लागत आहे. त्यांची इच्छा आहे का, हे माहिती नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्यावर टीका करताना आमची एकतरी जागा निवडून आली; पण शिवसेनेची असलेली जागा गेली. सध्या गावागावांत राष्ट्रवादीचे वर्चस्व असून काही ठिकाणी कॉंग्रेसचे अस्तित्व आहे. यामध्ये शिवसेनेला दोन्ही कॉंग्रेस किती स्पेस देणार हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शिवसेना किती जागा लढणार यापेक्षा किती ताकदीने लढतील यावर त्यांचे यश अवलंबून आहे.'' यश मिळेल का हा तर संशोधनाचा भाग आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडविली.

शेतात गव्हाला पाणी देताना पाय घसरला, विहिरीत पडून दहावीत शिकणाऱ्या आनंदचा मृत्यू
 
आमदार शिवेंद्रसिंहराजेंना विकासकामासाठी अजित पवार मदत करत आहेत. त्याबाबत श्री. दरेकर यांना विचारले असता. ते म्हणाले, ""अजितदादा हे विकासाच्या कामांमध्ये अगदी रोख ठोक भूमिका घेऊन कामे करतात. याबाबत काहीही दुमत नाही. राजकारणाच्या पुढे जाऊन एखाद्या शहराच्या विकासासाठी मदत केली तर त्यात काही गैर नाही.'' राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्षपद दिले जात आहे. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल, यावर ते म्हणाले, ""राहुल गांधी यांचा स्वतःच्या पक्षावर प्रभाव आणि परिणाम होत नाही. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याचा विषय दूरच आहे.''

डोंगरातून पायपीट करत अजून किती दिवस आम्ही शाळेत जायचे, कऱ्हाड आगाराच्या कारभारास विद्यार्थी वैतागले 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT