सातारा

युवक कॉंग्रेस देणार राज्यभरातील एक हजार युवकांना नेतृत्वाची संधी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : राज्यभरात आगामी काळात येऊ घातलेल्या महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत युवकांना योग्य स्थान मिळाले पाहिजे. त्यांच्या हातात नेतृत्व आले पाहिजे, यासाठी युवक कॉंग्रेसने सुपर 1000 उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ आज येथे झाला. त्यावेळी श्री. मोरे बोलत होते. श्री. मोरे उपक्रमाचे राज्य समन्वयक आहेत. त्यांनी सुपर 1000 उपक्रमाची घोषणा केली. त्यावेळी युवक कॉंग्रेसचे सहप्रभारी प्रदीप सिंधव, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, युवक कॉंग्रेस जिल्हा प्रभारी अजय इंगवले, युवक कॉंग्रेसचे सचिव उमेश ताटे, महासचिव अभिजित चव्हाण उपस्थित होते. श्री. मोरे म्हणाले, "कॉंग्रेसने देश बांधण्याचे, नव्या नेतृत्वांना नेहमीच संधी दिली. मात्र, अलीकडच्या सात वर्षांपासून देशाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलली आहे. लोकांमध्ये धर्माच्या भिंती उभ्या करून त्यांच्यात फूट पाडली जात आहे. युवक बेरोजगार होत आहेत. त्यांचा गैरवापर केला जातो आहे. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. सत्तेचे केंद्रीकरणामुळे लोकशाही धोक्‍यात आली आहे. देशात फॅसिस्ट शक्ती डोके वर काढत आहेत. अशा स्थितीत पर्याय शोधण्यापेक्षा राजकारणाला समाजकारणाचा पर्याय देण्याचा विचार केला आहे.''

युवकतर्फे सुपर 1000 असा युवकांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम घेतला आहे. त्याच्या माध्यमातून पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यातील एक हजार युवकांना सकारात्मक राजकारण करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहोत. उपक्रमाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये एक हजार युवकांना संधी देण्याचा युवक कॉंग्रेसचा मानस आहे. युवकांना प्रशिक्षण देऊन नवा भारत घडवण्यासाठी त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. युवक कॉंग्रेसच्या सुपर 1000 उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्‍यक आहे. तो भरून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT