सातारा

'या' जिल्ह्यात खासगी रुग्णालय, मोठ्या शाळा, महाविद्यालयांचा 'या' साठी शाेध सुरु

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाचा उद्रेक वाढला असून, दररोज 50 ते 60 रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता आयसीयूची सुविधा असलेली खासगी रुग्णालये, तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची सुविधा आणि विलगीकरण कक्ष असलेली रुग्णालये अधिगृहित केली जाणार आहेत. यामध्ये कोविड हॉस्पिटल 21, तर 19 कोविड केअर सेंटरचा समावेश आहे. त्यामुळे वाढलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्नशील आहेत.
 
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1601 वर पोचली असून, 586 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज 50 ते 60 रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. यामध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कातून बाधित झालेले तसेच लग्न, अंत्यविधी, वाढदिवसांचे कार्यक्रम, चोरी चुपे होणाऱ्या पार्ट्या यातूनच संसर्ग अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या 900 वरून 1600 वर गेली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्माण केलेली सुविधा अपुरी पडू लागली आहे.
 
कोरोनाचा संसर्ग जून, जुलै व ऑगस्टमध्ये वाढण्याच्या शासनाच्या सूचना लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्‍यामधील खासगी हॉस्पिटल व मोठ्या शाळा, महाविद्यालयांची माहिती घेऊन तेथे उपचाराची सुविधा करता येईल का, याची तयारी सुरू केलेली होती; पण संख्या जास्तच वाढल्याने आता आरोग्य विभागाला आणखी काही खासगी हॉस्पिटलस्‌ अधिगृहित करावी लागणार आहेत. यामध्ये कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी आयसीयूची सुविधा असलेली हॉस्पिटलस्‌ आणि सौम्य लक्षणे व संशयित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी रुग्णालये घेतली जाणार आहेत. त्यासाठीची तयारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुरू आहे. त्यानुसार कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर अशी सुविधा उपलब्ध करताना 21 कोविड हॉस्पिटलस्‌ आणि 19 कोरोना केअर सेंटरचा समावेश आहे. त्यामुळे येथे वाढलेल्या रुग्णांवर उपचार मिळणार आहेत. खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
 
सध्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात 120, कऱ्हाड कृष्णा हॉस्पिटलमध्ये 200, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 50, मायणी येथे 40, बेलएअर हॉस्पिटलमध्ये 50 अशी रुग्णांची उपचार करण्याची क्षमता आहे. आता वाढलेल्या रुग्णसंख्येशी तुलना करता कशीतरी बेरीज होत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता आगामी काळात जागा कमी पडणार आहे. त्यामुळे खंडाळा, फलटण येथे खासगी रुग्णालये अधिगृहित करण्यात येत आहेत. अधिगृहित रुग्णालयांत स्टाफ उपलब्ध करणे, त्यांचा निम्मा स्टाफ वापरणे आदी उपाययोजना सध्या कराव्या लागत आहेत. 

रॅपिड ऍण्टीबॉडी टेस्ट किटस्‌ची आवश्‍यकता 

कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे तातडीने समजावे, यासाठी रॅपिड ऍण्टीबॉडी टेस्ट किटस्‌ जिल्हा रुग्णालयासह इतर प्रमुख रुग्णालयांत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर तातडीने उपचार मिळू शकतात, तसेच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला, की त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी पाठविले जाईल. जेणे करून नव्याने बाधित होणाऱ्यांना तातडीने उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध होईल. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

जाणून घ्या महावितरणचा व्हॉट्‌सऍप क्रमांक; घरुनच नोंदवा विजेबाबतच्या तक्रारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT