सातारा

महाविकास की भाजप; सातारा जिल्हावासियांना उत्सुकता निकालाची

सिद्धार्थ लाटकर

सातारा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात एकूण "पदवीधर'साठी 58.27 टक्के, तर "शिक्षक'साठी 81.96 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावरील किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील उमेदवारांतच रस्सीखेच आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून बसले होते. मतदानासाठी सकाळच्या सुमारास मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता. मात्र, दुपारनंतर मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले.

तुम्हाला मुंबईशी पंगा घ्यायचाय का? संजय राऊतांचा योगींना इशारा 

कोविड संसर्गाच्या काळातील ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रत्येक मतदाराची केंद्रात प्रवेश करताना तपासणी केली जात होती. कोरोनाच्या प्रादुर्भावातही मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. "पदवीधर'साठी जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत 7.21 टक्के, तर "शिक्षक'साठी 10.65 टक्के मतदान झाले होते. 12 वाजेपर्यंत "पदवीधर'चे 20.23 टक्के, तर "शिक्षक'साठी 31.34 टक्के मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीत काही प्रमाणात वाढ होऊन "पदवीधर'चे 34.86 टक्के मतदान झाले होते, तर "शिक्षक'साठी 56.43 टक्के मतदान झाले होते. दुपारी दोननंतर मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावत मतदान केल्याचे पाहावयास मिळाले. दुपारी चार वाजेपर्यंत "पदवीधर'साठी 49.35 टक्के, तर "शिक्षक'साठी 74.36 टक्के मतदान झाले होते. सायंकाळच्या सुमारास मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचे कर्मचारी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून मतदान केंद्रात प्रवेश करताना मतदारांची सॅनिटायझर, थमल स्क्रिनद्वारे तपासणी केली जात होती. त्याचबरोबर मास्क घालण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. 

कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरु द्या : उदयनराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT