सातारा

सातारा : मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिकेचीही व्यवस्था

सिद्धार्थ लाटकर

सातारा : पदवीधर व शिक्षक निवडणूक 2020 ही शांततेत पार पाडावी. तसेच या निवडणुकीसाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी नुकत्याच केल्या.

निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात नुकताच घेतला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन श्रीकांत देशपांडे पुढे म्हणाले, मतदारांना मतदान केंद्रावर कुठल्याच अडचणी निर्माण होणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच मतदानाविषयक काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची  व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मतदान प्रक्रियेसाठी एक हजार 100 अधिकारी, कर्मचारी काम करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 231 सूक्ष्म निरीक्षक नेमले  असून 51 झोनल ऑफीसर नेमले आहेत. वाहतुक व्यवस्थेची तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्र मतदानच्या सॅनिटायझर करण्यात येणार असून कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले.

प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकही संवेदनशिल मतदान केंद्र नाही. आत्तापर्यंत आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांसाठी शिक्षक, पदवीधर निवडणुकीत मतदानाची ठरली वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT