सातारा

पुण्यातील युवतीच्या अपहरणप्रकरणी साताऱ्यातील नऊ युवकांना अटक

सिद्धार्थ लाटकर

सातारा : पुण्यातून अपहरण करुन आणलेल्या 23 वर्षीय युवतीची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी साताऱ्यातील नऊ युवकांवर चतुरश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई पुणे विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. संबंधित महिलेच्या सहकाऱ्यांने याबाबत पोलिसांत दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यातील सेनापती बापट रस्त्यालगत असलेल्या आयसीसी टॉवरजवळ संबंधित युवती आपल्या सहकाऱ्यासोबत उभी होती. त्यावेळी एका चार चाकीतून आलेल्या दोघांनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघांना जबरदस्तीने गाडीत कोंबले. संबंधित वाहन हे सातारा पासिंग असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. त्यानंतर या दोघांना घेऊन संबंधित वाहन साताऱ्याच्या दिशेने नेले.

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) 

दरम्यान कात्रज घाटात युवती सोबतच्या युवकाला तेथेच सोडून ते साताऱ्याकडे गेले. त्यानंतर संबंधित फिर्यादीने (युवकाने) तातडीने आमच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेची कथन केले. संबंधित वाहन हे साताऱ्याच्या दिशेने गेल्याने आम्ही नजीकच्या पोलिस स्टेशनला कळविले. या वाहनाचा मागोवा घेतला असता सातारा नजीकच्या टोलनाक्‍याकडे असल्याचे समजले.

कऱ्हाडला 30 हून अधिक डॉक्‍टरांना कोरोना, नॉन कोविड रुग्णांवर उपचारही बिकट  

या परिसराची तातडीने नाकाबंदी करून वाहन अडविण्यात आले. त्यातून युवतीची सुटका केली. ही कामगिरी योग्य आणि तातडीने समन्वय झाल्याने करू शकलो, असे पुणे विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी नमूद केले. या अपहरणकर्त्यांवर चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चला तर मग आजच सकाळच्या 'विघ्नहर्ता' उपक्रमात नोंदणी करून सहभागी व्हा

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34), संदीप किसन जाधव (वय 28), अक्षय कृष्णा दीक्षित, (26), राहुल बाळासाहेब बरकडे (वय 27), सागर अनिल कोळेकर (23), मंगेश राजाराम खांडजोडे (18), शुभम नवनाथ बरकडे (20), मंगेश रमेश शिंदे (वय 21) आणि किरण दिलीप बाबर (वय 23) सर्व (रा. सातारा) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले. 

लाहोटी, झंवर, सारडा, लढ्ढा, राठी चमकले; माहेश्वरीची काैतुकाची थाप

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT