Mahatma Phule Esakal
सातारा

Mahatma Phule : महात्मा फुलेंच्या कुलभूमीकडे दुर्लक्ष

आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम करणाऱ्या महात्मा फुलेंचे मूळगाव असलेल्या कटगुण (ता. खटाव) गावाकडे केवळ त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच पाहिले जात आहे.

ऋषिकेश पवार

पुसेगाव - आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम करणाऱ्या महात्मा फुलेंचे मूळगाव असलेल्या कटगुण (ता. खटाव) गावाकडे केवळ त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच पाहिले जात आहे. त्यांच्या कार्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुलभूमी कटगुण येथे महात्मा फुलेंचे जागतिक दर्जाचे भव्य, प्रेरणादायी स्मारक उभे राहणे आवश्यक आहे.

महात्मा फुले यांची कर्मभूमी पुणे असली, तरी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय. महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जण येथे येत असतात. मात्र, ज्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची संधी दिली, त्यांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले, त्याच महात्मा फुले यांच्या कुलभूमीत सुधारणा करण्याचे औदार्य अद्याप सरकारने दाखविलेले नाही.

गावात शासनाच्या जागेत स्मारकाची भव्य इमारत आहे. या स्मारकाची दुरवस्था झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. काही ठिकाणी पडझड झाली आहे. स्मारकाची देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी नोकरवर्ग नाही. महात्मा फुलेंच्या नावाने सुरू केलेले ग्रंथालय बंद अवस्थेत आहे. स्मारक परिसरात महात्मा फुले यांचा पुतळा असला, तरी स्मारक परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. येथील फुले यांच्या पूर्वजांचे घर देखील जीर्णावस्थेत आहे. कुलभूमी पण विकासाच्या प्रतीक्षेत आहे. यावरूनच सरकारची फुले दांपत्याच्या महान कार्याबद्दलची उदासीनता लक्षात येते.

खरंतर, महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी म्हणून कटगुण येथे महात्मा फुले शिल्पसृष्टी उभारून त्यांचा जीवनपट साकारण्याची गरज आहे. येथील फुले यांच्या घराचा जीर्णोद्धार, कटगुणला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा, महात्मा फुले ग्रंथालयाचे नूतनीकरण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्मारक परिसर व गावचा विकास अशी कामे हाती घेणे आवश्यक आहे. मात्र, सरकारचा ढिसाळ कारभार आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे कटगुण दुर्लक्षितच राहिल्याचे चित्र आहे.

आजमितीला महात्मा फुलेंचे विचार आणि कार्य तळागाळापर्यंत पोचवायचे असेल, तर त्यांच्या कार्याचा इतिहास सांगणाऱ्या जागतिक दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम लवकर सुरू करण्याचे औदार्य शासन व प्रशासनाने दाखविले पाहिजे, तसेच कुलभूमी आणि परिसराचा विकास शासनाच्या माध्यमातून हाती घेतला पाहिजे. जेणेकरून महात्मा फुलेंना वंदन, अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी हे स्मारक प्रेरणादायी, स्फूर्तिदायी ठरेल.

स्‍मारकाबाबतच्‍या घोषणा वाऱ्यावर...

महात्मा फुले स्मारक परिसर विकासाच्या घोषणा पुष्कळदा केल्या गेल्या; पण प्रत्यक्षात आजअखेर स्मारकाच्या कामाला मुहूर्त देखील मिळाला नाही. प्रत्येक शासनाकडून महात्मा फुले व पुरोगामी विचार जोपासण्याची भाषा केली जाते. मात्र, त्यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचविण्यात ते असमर्थ राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT