Rabi Season Crop
Rabi Season Crop esakal
सातारा

राज्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यानं 'असं' घेतलं विक्रमी उत्पादन!

महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी (Jawali Mountain Area) वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. आज या भागातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. अधिकच्या उत्पादन वाढीसाठी यामुळे प्रयत्न होत आहेत. याची प्रचिती रब्बीच्या हंगामात (Rabi Season Crop Competition) पाहायला मिळाली. सन २०२०- २१ रब्बी ज्वारीच्या पीक स्पर्धेत (State Level Crop Competition) तालुक्यातील सोनगावच्या साहेबराव मन्याबा चिकणे यांनी आपल्या शेतात ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवत जावळीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. (Rabi Season Crop Competition Sahebrao Chikane From Songaon Won The First Prize In The Crop Competition)

जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात.

शेतकऱ्यानं अशा पध्दतीनं घेतली ज्वारीची काळजी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते कृषिदिनी मुंबई याठिकणी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहेबराब चिकणे यांच्यावतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी हा सन्मान स्वीकारला. चिकणे यांनी सोनगाव या ठिकाणच्या आपल्या शेतीमध्ये फुले रेवती या ज्वारीच्या वाणाची वापर केला. याकरिता प्रतिएकरी ४ किलो बियाणांवर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून शेतात पेरणी केली. पेरणीकरिता पाच बैलगाड्या शेणखत, १०० किलो निंबोळी पेंड या जैविक खताबरोबरच, १०:२६ : २६ १५० किलो, सिलिकॉन, मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी पाच किलो, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी आठ किलो आदी खतांचा पेरणीवेळी योग्य वापर करण्यात आला. पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया डोस देऊन पाणी देण्यात आले.

शेती शास्त्रज्ञांची प्रत्यक्ष भेट

पिकांच्या योग्य वाढीसाठी तण, कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्या. वेळोवेळी फवारणी केली गेली. याचबरोबर पेरणीनंतर २१ दिवसांनी विरळणी करून दाट झालेली रोपे उपटून काढण्यात आली. पिकाला पाणी देताना प्रत्येक वेळी जीवांमृताचाही वापर करण्यात आला. विद्राव्य खतांची २१, ३०, ४० आणि ६० दिवसांनी फवारणी केली. अगदी सुरुवातीपासून पाण्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करण्यात आला. शेती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष याठिकणी भेट देऊन मार्गदर्शन केले. याचाच परिपाक म्हणून एका एकरामधून ४०.४ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन मिळाल्याचे साहेबराव चिकणे यांनी नमूद केले. याकरिता कृषी विभागाचे सुरुवातीपासून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Chief Minister Uddhav Thackeray

विक्रमी उत्पादन घेण्यात शेतकऱ्याला यश

रब्बी ज्वारीकरिता चिकणे यांच्या शेतात बीजप्रक्रियेपासून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अगदी छोट्या-छोट्या घटकांचाही बारकाईने समावेश करण्यात आला. पाण्याचा सुयोग्य व संरक्षित वापर करून खतांचा डोस, तसेच जैविक फवारणी याचे नियोजन केले. याकरिता येणाऱ्या अडचणींना कृषी विभाग व क्षेत्रिय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. याठिकणी शास्त्रज्ञांचीही भेट घडवून आणण्यात आली. यामुळेच ज्वारीचा उत्पादनाचा तालुका नासताही सुरुवातीपासूनच पिकाच्या गरजेनुसार पाणी व इतर घटकांचा पुरवठा झाल्याने जावलीसारख्या दुर्गम भागातील रब्बीच्या ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात शेतकऱ्याला यश मिळाले.

-रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी, जावळी

Rabi Season Crop Competition Sahebrao Chikane From Songaon Won The First Prize In The Crop Competition

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT