Mayor Rohini Shinde esakal
सातारा

'खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक; कऱ्हाडच्या नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा'

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक व सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनशक्ती आघाडीचे (Janshakti Aghadi) गटनेते राजेंद्र यादव यांनी केली आहे. त्या मागणीसाठी जनशक्ती आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट करत आज (गुरुवारी) उपोषणास बसणार असल्यावरही ते ठाम आहेत. (Rajendra Yadav Demand To File A Case Against Mayor Rohini Shinde At The Police Station Satara Political News)

पालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे.

नगराध्यक्षांच्या मनमानी व खोटारडेपणाच्या कारभाराविरोधात जनशक्ती आघाडीच्या सर्व नगरसेवकांतर्फे गटनेते यादव आज उपोषणास बसणार आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे त्यांनी गुन्हा दाखल करण्यासह उपोषणावर ठाम असल्याचे कळवले आहे. श्री. यादव म्हणाले, ‘‘पालिकेचे अंदाजपत्रक उपसूचनेद्वारे मंजूर आहे, ती वस्तुस्थिती डावलून नगराध्यक्षांनी अंदाजपत्रकाची सूचना एकमताने मंजूर झाल्याची खोटी माहिती व त्याची खोटी कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली आहेत. बहुमताने उपसूचना मंजूर झाली आहे, असा अहवाल मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Officer Ramakant Dake) यांनीही दिला आहे, तरीही नगराध्यक्षांनी अंदाजपत्रक व त्याची कागदपत्रे एकमताने मंजूर आहेत, अशी खोटी माहिती पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी दिशाभूल केल्याने चार महिन्यांपासून अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. नगराध्यक्षांचा खोटारडेपणा व मनमानी कारभारच त्याला कारणीभूत आहे.’’

जनशक्ती आघाडीने मागणी करूनही जिल्हाधिकारी सिंह यांनी अंदाजपत्रकावर (Karad Municipal Budget) कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यांनाही खोटी माहिती पुरवली हेच कारण जबाबदार आहे. त्यामुळे जनशक्ती आघाडीतील नगरसेवकांतर्फे उद्या पालिकेत आमरण उपोषणास बसणार आहे. नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पालिका प्रशासन व पालिकेच्या सभागृहासह सर्व नगरसेवकांची दिशाभूल केली आहे. त्यांच्यावर अंदाजपत्रकाची खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक व सभागृहाची दिशाभूल केल्यासंदर्भात नगराध्यक्षांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी उपोषणास बसत आहोत. प्रशासनालाही कार्यालये बंद ठेवण्यास भाग पाडणार आहोत. त्यांना कामही करून देणार नाही. लोकशाहीमध्ये नगराध्यक्षा बहुमताचा आदर ठेवत नसतील तर त्याविरोधात आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आज (गुरुवारपासून) नगराध्यक्षांच्या मनमानी व खोटारडेपणाच्या विरोधात उपोषणास बसत आहे, असे त्यांनी सांगितले.

Rajendra Yadav Demand To File A Case Against Mayor Rohini Shinde At The Police Station Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT