Mahadev Jankar esakal
सातारा

केंद्र, राज्य सरकारची मदत देऊ; जानकरांचं पूरग्रस्तांना आश्वासन

आंबेघरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी संवाद

अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : केंद्र सरकार, राज्य सरकारचीही तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही घाबरायचे कारण नाही. तुम्ही खचून जाऊ नका, असा आधार राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriy Samaj Party) नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आंबेघर, शिद्रुकवाडी (Patan Taluka Landslide) येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय व स्थलांतरित केलेल्या कुटुंबातील लोकांशी भेट घेऊन दिला. मोरगिरीतील मोरणा विद्यालयात मोरणा गुरेघर धरणांतर्गत वसलेले आंबेघर, त्याचबरोबर शिद्रुकवाडी येथील बाधित कुटुंबांतील लोकांशी भेट घेण्यासाठी ते येथे आले होते. त्याचदरम्यान त्यांनी लोकांशी संवाद साधला.

केंद्र सरकार, राज्य सरकारचीही तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही घाबरायचे कारण नाही, असा विश्वास महादेव जानकर यांनी दिला.

त्यांनी संबंधित कुटुंबातील लोकांशी व स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांतील व्यक्तींची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. जनावरे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना अर्थार्जनाचे साधन म्हणून त्यांना मदत केली. केंद्र सरकारची तुम्हाला मदत मिळेल, राज्य सरकारची मदत मिळेल. तुम्ही घाबरायचे कारण नाही. एका एका घरातील सहा सहा माणसांचा या दुर्घटनेत मृत्यू होऊन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र, तुम्ही खचून जाऊ नका, अशा शब्दांत त्यांनी आधार दिला. मंडल अधिकारी, तलाठी माहिती घेऊन पंचनामे करतील. मदत देताना दुजाभाव केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT