सातारा

कारागृह भागातील मिळकतधारकांना मोठा दिलासा, उदयनराजेंच्या पाठपुराव्याला यश

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा कारागृहालगत मिळकतींच्या नवीन बांधकामांना शासनाने 500 मीटरऐवजी 100 मीटरची मर्यादा केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी क्रेडाई, पालिकेचा नियोजन प्राधिकरण यांच्यासमवेत बैठक घेऊन स्थायी समिती स्थापन केली आहे. या निर्णयामुळे 100 मीटरबाहेरील मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात उदयनराजे यांनी म्हटले, की जिल्हा कारागृहालगत 500 मीटर अंतराच्या आत असलेल्या खासगी मिळकतधारकांना त्यांच्या वास्तू विकसित करावयाच्या आहेत. मात्र, शासनाचे सुरक्षितता आणि गोपनीयता राखण्याच्या दृष्टिकोनामधून 500 मीटरमधील बांधकामांना स्थायी सल्लागार समितीच्या मंजुरीने नगरपालिकेच्या माध्यमातून बांधकाम आराखड्यांना मंजुरी देणे अपेक्षित होते. याकामी गठीत केलेल्या समितीची बैठकच होत नव्हती. बैठक झाली, तरी काहीही निर्णय होत नव्हते. त्यामुळे या परिसरातील मिळकतधारक त्रस्त झाले होते. त्यानंतर शासनाने गेल्या वर्षी 500 मीटरऐवजी 100 मीटरची मर्यादा अंतर मान्य केले.

याकामी नगरपालिका नियोजन प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह अधिकारी यांची स्थायी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत करावी, अशी सूचनाही केली होती. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अशी समिती गठीत करण्याबाबतची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी क्रेडाई व पालिका नगररचना विभागाची बैठक घेऊन समिती स्थापन केली आहे. या निर्णयामुळे कारागृह परिसरातील मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT