'निवडणुकीबाबत भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण, फारसा प्रतिसाद मिळाला नाही.'
सातारा : रिपब्लिकन पक्ष (Republican Party) बहुजनांच्या हक्कासाठी जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत (Nagar Panchayat Election) सर्व तयारीने उतरणार आहे. राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल असे दोन्ही पर्याय आमच्यासमोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांपैकी किमान ५० जागा ताकदीने लढविणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड (Ashok Gaikwad) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
रिपब्लिकन पक्षाची (ए गट) आगामी निवडणुकांतील भूमिका जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी मांडली. ते म्हणाले,‘‘ जिल्ह्यात सहा नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. याबाबतची घोषणा होऊन सहा दिवस झाले आहेत. याबाबत भाजप (BJP) पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. पण, फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीत सर्व पर्याय खुले आहेत. जो पक्ष आम्हाला न्याय देईल, त्यासोबत आम्ही जाऊन निवडणूक लढवणार आहोत.
येत्या आठ दिवसांत पक्षीय आघाड्यांचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी दलितांच्या हक्कासाठी संघर्ष करणारी होती. या विचारधारेला प्राधान्य देणाऱ्या पक्षीय आघाड्यांशी आम्ही युती करणार आहे.’’ खंडाळा, लोणंद नगरपंचायतींमध्ये रिपब्लिकन पक्ष पॅनेल टाकणार आहे. शिरवळला सहा तर वडूज येथे चार अशा जागा लढण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.