Satara News  sakal
सातारा

Satara News : बिलांवरील आकड्यांमुळे घशाला कोरड...जीवन प्राधिकरणाचा सावळागोंधळ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Satara News : साताऱ्यातील जीवन प्राधिकरणाच्या मनमानीमुळे नागरिकांना पाणी बिलाच्या मोठ्या रकमेचा धक्का बसला आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्राधिकरणाच्या सावळ्या कार्यपद्धतीमुळे संताप वाढत आहे.

प्रशांत पाटील

सातारा : चार- चार महिन्‍यांची पाणी वापराची बिले पाठवणाऱ्या जीवन प्राधिकरणाचा मनमानी आणि सावळागोंधळ पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. दसरा, दिवाळीच्‍या तोंडावर भलामोठ्या रकमेची बिले पाहून हजारो नागरिकांच्‍या घशाला कोरड पडली आहे. तक्रारी करा, आंदोलने करा, निवेदने द्या; पण कार्यपद्धतीत सुधारणा न करण्‍याचा चंगच प्राधिकरणाने आणि पोसलेल्‍या ठेकेदारांनी बांधल्‍याचे दिसून येत आहे.

प्राधिकरणाच्‍या या सावळ्यागोंधळाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या त्रासात भरच पडत चालली आहे.

चार ते आठ हजारांची बिले

शाहूपुरीसह विलासपूर आणि इतर भागांतील नागरिकांना जीवन प्राधिकरणाच्‍या वतीने पाणीपुरवठा बिले पाठविण्‍यात आली आहेत. ही बिले चार महिन्‍यांसाठीची असून, त्‍यावरील रकमा चार ते आठ हजारांच्‍या घरात आहेत.

एकदम एवढी रक्कम बिलापोटी कशी जमवायची, असा प्रश्‍‍न सर्वच स्‍तरातील ग्राहकांना पडला आहे. याबाबत प्राधिकरणाकडे विचारणा करणाऱ्यांना थातुरमातुर उत्तरे देत पाणीबिलात किरकोळ सुधारणा करत त्‍यांची बोळवण करण्‍यात येत आहे.

नियम दोन महिन्‍यांचा

पाणी वापरासाठीची बिले दोन महिन्‍यांतून देण्‍याचा नियम आहे. असे असतानाही ठेकेदारासह स्‍वत:च्‍या घरात लक्ष्‍मीने पाणी भरावे, यासाठी यात बिल वाटप चक्रात बदल केल्‍याची माहिती प्राधिकरणाशी निगडित व्‍यक्‍ती देत आहेत. बिलांबाबत तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना अधिकारी, कर्मचारी सॉफ्‍टवेअर बिघाडाच्‍या नावाखाली चुका लपवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत.

इतर यंत्रणांना जमते...यांना का नाही

वीज वितरणसह इतर यंत्रणा आपल्‍या सुविधांपोटीची रक्कम ग्राहकांकडून दर महिना आकारते. त्‍यासाठीची सुविधा त्‍यांनी सक्षम केली असून, त्‍यांच्‍यासारखी यंत्रणा प्राधिकरणाला उभारणे का शक्‍य होत नाही, हा प्रश्‍‍न उपस्थित होत आहे.

सातारकरांनाे जागे व्‍हा...

साताऱ्याशी निगडित असणारे प्रश्‍‍न सुटावेत, यासाठी कोणत्‍याही पातळीवर प्रामाणिक प्रयत्‍न होत नसल्‍याचे दिसून येत आहे. पाण्‍यासारख्‍या मूलभूत सुविधेत होणाऱ्या राजरोस लुटमारीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. शाहूपुरीतील समस्‍यांसह प्राधिकरणातील अनागोंदीवर भारत भोसले हे एकमेव आक्रमक असतात. त्‍यांनी या प्रश्‍‍नी नुकताच आंदोलनाचा इशारा दिला आहे. इतर लोकप्रतिनिधी या प्रश्‍‍नाचे गांभीर्य नसल्‍याने सातारकरांनाच जागे होत प्राधिकरणातील सावळागोंधळ मोडून काढणे आवश्‍‍यक आहे.

बैठकीत हो... हो...

यापूर्वीही अनेकदा प्राधिकरणाच्‍या अडचणींबाबत अनेक बैठका झाल्‍या. या बैठकीत वरिष्‍ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी बैठका घेतल्‍या. प्रत्‍येक बैठकीत ‘येसऽऽऽयेस’ म्‍हणारे येथील अधिकारी नंतर ‘नोऽऽऽनो’ करत कामात सुधारणा करण्‍याचे टाळत असल्याचा आरोप होत आहे.

प्राधिकरणांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रत्येक वेळी तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. बिल वाटप प्रणालीत सुधारणा न झाल्यास आगामी काळात प्राधिकरणांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.

-भारत भोसले, शाहूपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT