सातारा

खंडीत वीज पुरवठ्यामुळे पुसेगावचे काेविड केअर सेंटर अडचणीत

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : पुसेगाव येथे गेले 15 दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून पुसेगाव ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेले 15 दिवस वीज वितरणद्वारे वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
 
गेले वर्षभर दुरुस्तीच्या नावाखाली दर मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित असतो. परंतु, अजूनही दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली नाहीत. सध्या पुसेगाव परिसरात दररोज मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या कालावधीत बंद करण्यात आलेला वीजपुरवठा अनेकवेळा पाऊस थांबल्यानंतर रात्रभर सुरू करण्यात येत नाही. त्यामुळे लोकांना अंधारात राहावे लागते.

साता-याचं वातावरण एकदम कुल, चला शहर बनवूया कलरफुल!

कोरोनामुळे सध्या अनेकदा बाजारपेठ बंद असते. दूरवर जाऊन भाजीपाला खरेदी करावा लागत असल्याने लोक भाजीपाला फ्रीजमध्ये आणून ठेवतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू झाला. त्यावेळीही लोकांनी भाजीपाला आणून फ्रीजमध्ये ठेवला होता. परंतु, त्याही काळात विजेच्या सततच्या खंडित होण्याने फ्रीज बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची व दुधाची नासाडी झाली.

वात्सल्यला बिल्डर्सचं बळ; सदस्यांना मिळणार मोफत श्वास

सतेज पाटील यांच्या ९५९९ ची कार्यकर्त्यांत क्रेझ
 
पुसेगाव येथे कोविड केअर सेंटर आहे. तेथे विविध गावांतील लोकांवर उपचार सुरू आहेत. परंतु, वारंवारच्या वीज पुरवठ्यामुळे या केंद्रातही लोकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुकानदारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या वीज वितरणच्या मनमानी कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 

ऑनलाइन कामांचा खोळंबा
 
कोरोनाच्या काळात आजही अनेक लोक घरातून ऑनलाइन कामे करत आहेत. अनेक विद्यार्थी घरातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. परंतु, ऐन कामाच्या वेळीच वीज गायब असते. दररोज अनेकदा वीज ये-जा करत असल्याने पुसेगाव येथे ऑनलाइन कामाचा पुरता फज्जा उडाला आहे. विजेच्या या खेळखंडोब्यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ब्रेकअप, नैराश्य आणि मितवा : आयुष्याकडं सकारात्मकतेनं बघायला काय हरकत आहे?

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT