सातारा

महाबळेश्‍वर, पाचगणीत नाईट पार्ट्या, ऑर्केस्ट्रा, हॉटेलिंगचा धिंगाणा नाही चालणार : जिल्हाधिका-यांचा आदेश

सिद्धार्थ लाटकर

सातारा : महाबळेश्‍वर व पाचगणी या ठिकाणी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी रात्री दहा वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्बंध घालत उल्लंघन करणाऱ्या संबंधिताविरुद्ध दंडात्मक तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
 
दर वर्षी 31 डिसेंबरला महाबळेश्‍वर व पाचगणी या ठिकाणी राज्य व राज्याबाहेरील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वत्रिक सर्वच कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. महाबळेश्‍वर येथे 31 डिसेंबरला नाईट पार्ट्या, ऑर्केस्ट्रा व हॉटेलिंग सुरू ठेवत रात्रभर धिंगाणा घातला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेत महाबळेश्‍वर व पाचगणीतील रात्री दहानंतरच्या सर्व कार्यक्रमास बंदी घातली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास निश्‍चितपणे मदत होईल असा विश्वास प्रशासनास वाटत आहे.

शिष्यवृत्तीच्या बहाण्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना गंडा!

टेबललॅण्ड, सिडने पॉईंटसह वेण्णालेकच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार; काेट्यावधींचा निधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबे रात्री 11 वाजल्यानंतर सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशामधून राष्ट्रीय महामार्गावर असणारे हॉटेल, रेस्टॉरंट ढाबे वगळण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरुद्ध दंडात्मक तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT