सातारा

रेठरेत 23.54 लाखांचा अपहार; विकास सेवा सोसायटीच्या खत विभागप्रमुखावर गुन्हा दाखल

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : रेठरे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या खत विभागात 23 लाख 54 हजारांच्या अपहाराचा प्रकार आज उघडकीस आला. सोसायटीच्या फेरलेखा परीक्षणात तो प्रकार समोर आला असून, 2012 ते 2015 या कालावधीत अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपलेखापरीक्षक रोहित सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तत्कालीन खत विभागप्रमुख दिनकर सोमदे (रा. रेठरे बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेठरे बुद्रुकच्या विकास सेवा सोसायटीच्या खत विभागात दिनकर सोमदे विभागप्रमुख होते. त्या वेळी सोसायटीच्या खत विभागाचे एक एप्रिल 2012 ते 31 मार्च 2015 कालावधीतील लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी 10 नोव्हेंबर 2017 या वेळी दिले होते. त्यानुसार उपलेखा परीक्षक रोहित सूर्यवंशी यांनी लेखा परीक्षणाचे काम पूर्ण केले.

फेरलेखा परीक्षणानंतर सोमदेनी 23 लाख 54 हजार 767 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. 2012 ते 2015 या कालावधीतील रोख विक्री पुस्तक ते विक्री रजिस्टर तपासणी केली. त्या वेळी सहा लाख 26 हजार 304 एवढी रक्कम, तर उधार विक्री पावती दर आणि रोख विक्री पावती दर यामध्ये तफावत आढळली आहे. उधार विक्री दरापेक्षा रोखीने विक्री केलेल्या पावत्या कमी दराने काढल्या होत्या. त्यात फरकाची रक्कम अपहारित आहे, असे लेखा परीक्षकांचे म्हणणे आहे. त्या कालावधीतील नावे व्हाऊचर तपासणी केली. त्या वेळी 17 लाख 28 हजार 463 रक्कम आढळली आहे.

रोजकिर्दीला रोखीने वाहतूक खर्चाची बिले खर्ची पडली असून, नमूद वाहतूक व्हाउचरसोबत वाहतुकीची बिले उपलब्ध नसल्यामुळे या फरकाची रक्कम ही अपहारित रक्कम असल्याचे लेखापरीक्षकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. 

कोयनेतील मारूलमध्ये अतिसारामुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू; 40 जणांवर उपचार सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT