rickshaw  sakal
सातारा

Satara News : रिक्षाचालक आरटीओच्या रडारवर

सातारा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शंभर रिक्षाचालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सातारा : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

रिक्षांचा परवाना, पासिंग, गणवेश यासह इतर नियमांचे उल्लंघन केलेल्या कारवाईमधून सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वर्षभरात शहरातील शंभरहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करून तब्बल एक लाख १६ हजार महसूल जमा केला आहे.

पुढील काळात देखील नियम न पाळणाऱ्या रिक्षांचालकांविरोधात आरटीओ विभाग तीव्र कारवाईची मोहीम राबविणार आहे.

गेल्या वर्षभरात आरटीओ विभागाने महसूल वसुली अधिक केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तपासणी पथकांच्या कामगिरीचाही आलेख वाढल्याचे दिसून येत आहे.

या पथकाकडून वर्षभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महामार्गावर देखील कारवाईची मोहीम राबविली आहे. जेणेकरून अपघात रोखण्यास मदत होईल.

दरम्यान, शहरातील अनेक रिक्षाचालक ठरवून दिलेले गणवेश घालत नसल्याचे दिसून येते. यासह इतर वाहतुकीचे नियम शहरातील रिक्षाचालक पाळत नसल्याचे दिसून येते.

पथकांची नियुक्ती

सातारा शहरातील अनेक ठिकाणी अनधिकृत थांब्यावर रिक्षाचालक उभे असतात. मुख्य बस स्थानक असणाऱ्या ठिकाणी उलट्या दिशेने व बस स्थानकांबाहेर अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या असतात.

या प्रकारामुळे अनेकदा अपघात घडल्याच्या घटना घडत आहेत. पोवई नाका, गोडोली या ठिकाणी बस थांबणाऱ्या ठिकाणी रिक्षाचालक उभे असतात.

यासह राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, गोडोली नाका, जिल्हा परिषद परिसर, बस स्थानक परिसर या ठिकाणी रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्याने आरटीओ प्रशासनाने पथकांची नियुक्ती करत कारवाई केली आहे.

हे नियम न पाळल्याने कारवाई

  • रिक्षाचालकांकडे इन्शुरन्स नसणे

  • पीयूसी

  • पासिंग

  • गणवेश न घालणे

  • नियमांपेक्षा जादा भाडे आकारणे

  • भाडे नाकारणे

  • कागदपत्रे जवळ न बाळगणे

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधाची कारवाईची मोहीम सुरू आहे. रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करताना कागदपत्रे जवळ बाळगा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी

अशी केली कारवाई

  • एक एप्रिल २०२३ ते एक एप्रिल २०२४

  • ३१७ रिक्षा तपासणी

  • १०० रिक्षा दोषी

  • एक लाख १६ हजार रुपये दंड वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT