सातारा

बांधकाम विभाग जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतेय का?, नागरिकांचा संतप्त सवाल

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : मायणी-दहिवडी या मार्गावर काही दिवसांपूर्वी कातरखटाव ते तडवळे हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. या कामात खडी, मुरमाऐवजी चिकट मातीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे का? असा संतप्त सवाल जाणकार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. 

अतिपावसामुळे वडूज-पुसेगाव, वडूज-पुसेसावळी, वडूज-दहिवडी, वडूज-मायणी, मायणी-दहिवडी या सर्वच प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वडूज शहरातल्या छत्रपती शिवाजी चौक या मध्यवर्ती भागानजीकही मोठमोठे खड्डे पडले आहेत. वडूज-कातरखटाव मार्गावर ऊस वाहतुकीमुळे रस्त्याचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. मायणी-दहिवडी मार्गतर जणू मृत्यूचा मार्ग बनला आहे. या खड्ड्यांबाबत अनेक वेळा आवाज उठविला गेला. मात्र, सुस्त प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. दहिवडी-मायणी या मार्गावरून या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांचा नित्याचा प्रवास असतो. त्यांनीही आग्रह केल्यामुळे या मार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामास प्राधान्य दिले गेले असावे. मात्र, हे होत असताना काही ठिकाणी खड्ड्यात चिखलयुक्त माती टाकण्यात आली आहे. 

या ठिकाणच्या कर्मचारी, मजुरांना विचारणा केली असता काहींनी हे खात्यांतर्गत काम असल्याचे सांगितले, तर काहींच्या म्हणण्यानुसार हे ठेकेदाराचे काम असल्याचे समजते. वास्तविक पाहता खड्डे भरणाऱ्या ठेकेदारांची काही वर्षांची गॅरंटी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, खटाव तालुक्‍यात दर वर्षी खड्डे भरण्याचा असा कार्यक्रम सुरू असल्याचे जाणवते. त्यामुळे या खड्ड्यांतून नक्की कोणाचे खिसे भरण्याचा उद्योग सुरू आहे? असा सवाल केला होत आहे. दरम्यान, याबाबत बांधकाम विभागाचे उपअभियंता देसाई यांच्याशी संपर्क केला असता काही वेळा त्यांच्याकडून मोबाईल उचलला जात नाही, तर काही वेळेला कॉल डायव्हर्ट केल्याचे सांगण्यात येते. 

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 

बांधकाम विभागाच्या प्रशासनाने खड्डे भरण्याच्या कामात तत्काळ सुधारणा न केल्यास भागातील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खटाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, राष्ट्रीय समाज पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT