सातारा

विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे काम केळघर घाटात धिम्या गतीने; वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : विटा ते महाबळेश्वर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम केळघर घाटात विशेषतः केळघर ते काळा कडादरम्यान धिम्या गतीने सुरू आहे. त्याचा त्रास केळघर घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना व महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे. हे काम वेळेत पूर्ण होणार का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम करताना एका लेनचे काम पूर्ण करणे आवश्‍यक होते. मात्र, तसे न करता दुसरी बाजू उकरून ठेवली आहे. तर एका बाजूने कामही पूर्ण केलेले नाही. केळघर घाट सुरू होणाऱ्या वरोशीच्या पुढे व काळा कड्याच्यामागे चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. रस्ता उखडला असल्याने त्यावरून वाहने चालवताना धुळीचा सामना करावा लागतो. अगोदरच केळघर घाटातील रस्ता हा तीव्र नागमोडी वळणांचा रस्ता असून एक बाजू उखडली असून दुसऱ्या बाजूने कामही पूर्ण नसल्याने काही वळणे धोकादायक झाली असून दोन मोठी वाहने या रस्त्यावर बसत नाहीत. तीव्र वळणे असल्याने त्यातच रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने अपघातांची शक्‍यता नाकारता येत नाही.

नांदगणेच्या हद्दीत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे मशिन गेल्या अनेक दिवसांपासून एकाच जागेवर उभी आहेत. घाटातील संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. महाड तसेच कोकणात जाणारा जवळचा मार्ग म्हणून प्रवासी, वाहनचालकांना केळघर घाट सोयीस्कर वाटतो. मात्र, धिम्या गतीने काम सुरू असल्याने वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून लवकरात लवकर केळघर घाटातील प्रलंबित व रखडलेले काम ठेकेदाराने मार्गी लावून वाहनचालक व पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. 

महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची वर्दळ 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहिसा कमी झाल्याने महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची या घाटात नेहमीच वर्दळ दिसून येते. प्रामुख्याने शनिवार, रविवारी व सुटीच्या दिवशी महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असते. मार्च ते ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाउन असल्याने या घाटात वाहनांची वर्दळ कमी होती. या वेळेत हे काम पूर्ण होणे आवश्‍यक होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT