सातारा

प्राणीप्रेमींनाे तुम्हीही हे नक्की करा; पाचगणीत रोटरी क्‍लबचा स्तुत्य उपक्रम

सुनील कांबळे

पाचगणी : प्राण्यांकडून मानवाकडे प्रसारित होणाऱ्या आजारांना पशुसंक्रमित आजार किंवा झूनोटिक डिसीजेस असे म्हणतात. रेबीज हा त्यातील एक महत्त्वाचा आजार आहे. त्याच्यावर कुठलाही उपचार नाही. लसीकरणद्वारे प्रतिबंध हाच काय तो एकमेव उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक प्राणीप्रेमींनी आपापल्या कुत्रे व मांजरांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. सुनील देशपांडे यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर तीन दिवस राहणार बंद 

पाचगणी रोटरी क्‍लब व पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशुसंक्रमित दिनाचे औचित्य साधून कुत्री व मांजरे यांच्याकरिता आयोजित केलेल्या अँटीरेबीज शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. देशपांडे बोलत होते. प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन केले. अध्यक्षस्थानी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष किरण पवार होते. शिबिरात एकूण 49 श्वानांचे लसीकरण करण्यात आले.

काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले 

भारत पुरोहित यांनी स्वागत केले. प्रकल्प प्रमुख अली सेववाला यांनी प्रास्ताविक केले. सचिव शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अमोल आमते, अमोल चौधरी, रमेश भिलारे, रोटरी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राणीप्रेमी सामाजिक अंतर पाळून आणि मास्क लावून उपस्थित होते. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: ३० हजारांऐवजी १५ लाख रुपये मिळणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, ७३ प्रस्ताव सादर...

Khidrapur Kopeshwar Temple : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात अवतरणार ‘सुपरमून’; स्वर्ग मंडपात मध्यरात्री रंगणार खगोलीय चमत्कार!

Ambaghat Tunnel Project: आंबाघाटात सात किलोमीटरचा बोगदा; अडीच हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव; तीन पर्यायी ‘अलाइनमेंट’ सादर

Kolhapur News: ‘गोकुळ’च्या सुनावणीसाठी ८० लाख रुपयांचे मानधन; शासनाचे आदेश,ॲड. मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

रामललाच्या दर्शनासाठी नेपाळी भाविकांना, तर माता जानकीच्या दर्शनासाठी भारतीयांना प्रवास होणार सुलभ; 'सरयू-कमला एक्सप्रेस'चा शुभारंभ

SCROLL FOR NEXT