सातारा

हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची, राजमाची, विरवडे, ओगलेवाडीकरांना हवीय सदाशिवगडावर शिवसृष्टी

मुकंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) : हजारमाची येथील शिवकालीन ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून शासनाने महत्त्वकांक्षी शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याची मागणी परिसरातील सहा गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. नियोजित शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यासंबंधित शासन पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री पाटील व आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिले.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड असून, त्याचा वापर त्या काळात शत्रू टेहळणी नाका म्हणून केला जात असे. सदाशिवगडावर विस्तीर्ण पठार असून, ते वनविभागाच्या अखत्यारित आहे. शासनाच्या वनविभागाच्या माध्यमातून वनपर्यटन योजनेत सदाशिवगडाचा समावेश करून शिवसृष्टी प्रकल्प साकार करण्याची मागणी निवेदनाद्वारे परिसरातील हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची, राजमाची, विरवडे व ओगलेवाडीच्या ग्रामस्थांनी केली.

अनाथ व मनोरुग्णांसाठी ‘यशोधन ट्रस्ट’ 

यावेळी सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, राजमाचीचे शिवाडी डुबल, सुमन घाडगे, वनवासमाचीचे महिपती माने, अधिक सुर्वे, ऍड. सी. बी. कदम, ऍड. दादासाहेब जाधव, शरद कदम, कल्याण डुबल, प्रशांत यादव, गणेश घबाडे, दीपक लिमकर, सतीश पवार, विकास सुर्वे, पराग रामुगडे, सर्जेराव पानवळ, बाबासाहेब पवार, कृष्णात काळे, शिवाजी डुबल, रामदास पवार आदींची उपस्थिती होती.
 
दरम्यान, ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर शासनाने शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास गडाच्या वैभवात व सौंदर्यात भर पडेल. त्यामुळे राज्यातील पर्यटक व भाविकांचे आकर्षणाचे केंद्र होईल. नव्या पिढीस गडसंवर्धनामुळे प्रेरणा व स्फूर्ती मिळणार आहे, असे हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव यांनी सांगितले.

कऱ्हाड, मलकापूरातील रुग्णालये ताब्यात घेणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT