सातारा

"खो-खो'त मसूर क्रीडा मंडळ, साखरवाडीचे वर्चस्व

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : सातारा जिल्हा ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशन व मसूर क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित पुरुष व महिला सातारा जिल्हा खो-खो अजिंक्‍यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मसूर क्रीडा मंडळाने, तर मुलींच्या गटात साखरवाडी संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

मुलांच्या गटात सातारा स्पोर्टस क्‍लबने, महिलांच्या गटात शिवनगर संघाने व्दितीय क्रमांक मिळविला. यावेळी भलरी रोपवाटिका अतित यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अकिब पटेल यास एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, "महानंदा'चे संचालक वसंतराव जगदाळे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक दिलीपसिंह जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, महेंद्र भोसले, मनोहर यादव, विकास पाटोळे, कादर पिरजादे, सागर पाटोळे, कुलदीप क्षीरसागर, सातारा जिल्हा ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्रकुमार गाढवे, निवड समिती सदस्य दादासाहेब चोरमले, मनीषा शिंदे, ज्ञानेश्वर जांभळे, शशिकांत गाढवे, मसूर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कासम पटेल, सदस्य शरद जाधव, सतीश शेजवळ उपस्थित होते. 

पंच म्हणून महाराष्ट्र राज्य पंच प्रशांत कदम, अनिकेत मोरे, अतुल मोरे, मयूर साबळे, आनंदा जगदाळे, तर गुणलेखक व वेळाधिकारी म्हणून लक्ष्मण जाधव, आकाश कदम यांनी काम पाहिले. मसूर क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी स्वागत केले. संभाजी बर्गे व दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. गोल्डन पवार यांनी आभार मानले. 

Thank You Doctor : बाळाचा बोटीत जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! AQI ४९१ वर, हवा बनली विषारी; श्वसन विकारांच्या रुग्णांत प्रचंड वाढ

Video : छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य कसं होतं? तो काळ डोळ्यापुढं आणणारा AI व्हिडिओ व्हायरल; सच्चे मराठे असाल तर नक्की पाहाल

Kolhapur Dentist End Life : पाठीवरील बॅगेत दगड-विटा भरून तलावात उडी; मित्रांना शेवटचा मेसेज, डॉक्टरचा धक्कादायक निर्णय, चिठ्ठी सापडली अन्...

Latest Marathi News Live Update: संघाच्या मुख्यालयात देशप्रेमाची प्रेरणा मिळते : उपमुख्यमंत्री शिंदे

१९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान; अमेरिकेतील स्टिंग ऑपरेशनमुळे राजकीय भूकंपाचा दावा

SCROLL FOR NEXT