सातारा

खासदार पाटलांचा पाठपुरावा, कऱ्हाडला श्वापद उपचार केंद्र मंजूर

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : विविध घटनांत जखमी झालेल्यांसह जंगलातून भरकटलेल्या तणावग्रस्त श्वापदांवर त्वरित वैद्यकीय मदत करता यावी, यासाठी सातारा जिल्ह्यासाठी श्वापदांच्या उपचार केंद्रास मंजुरी मिळाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे. वराडे (ता. कऱ्हाड) येथे वन्यजीव विभागाच्या दोन एकरांतील जागेत हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहणार आहे. त्यासाठी सर्व अद्ययावत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस वन क्षेत्र वाढते आहे. त्यामुळे त्यात मानवी हस्तक्षेप वाढतो आहे. रस्ता ओलांडताना गाडीची धडक बसण्यासह वस्तीत आलेली श्वापदे मानवी संघर्षामुळे किंवा अन्य विविध घटनांत जखमी होतात. आजारी पडतात. त्यावेळी त्यांना त्वरित उपचाराची गरज असते. अशा वेळी जखमी श्वापद पुण्यातील कात्रज येथील राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाते. त्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने काही वेळेस उपचारापूर्वीच त्या श्वपदास जिवास मुकावे लागत होते. 

ही बाब लक्षात घेऊन श्‍वापद उपचार केंद्राची मागणी पर्यावरण अभ्यासक नाना खामकर व रोहन भाटे यांनी शासनासह खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन खासदार पाटील यांनी नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्याकडे मागणी केली. त्यानी मागणीचा पाठपुरावाही केला. त्यास खासदार पाटील यांना यश आले आहे. वन्यजीव विभागाने तालुक्‍यातील वराडे येथे उपचार केंद्र मंजूर केले आहे. त्याचे आदेश कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक डॉ. क्‍लेमेंट बेन यांनी दिले आहेत. श्वापदांसाठी केंद्र मंजूर झाल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील वन्यप्राण्यांची सोय होणार आहे. या केंद्रामुळे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार असल्याने निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

भुलीचे औषध देणारी बंदूक वापरता येणे शक्‍य 

चांदोली, सागरेश्वर व कोयना या तिन्ही राष्ट्रीय अभयारण्यांसह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी कऱ्हाड मध्यवर्ती ठिकाण आहे. तेथे प्रवास व त्याची सुलभता सहज सोपी आहे. त्यामुळे कऱ्हाडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी श्वापद उपचार केंद्र वराडे येथे मंजूर झाले आहे. केंद्रात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असल्याने बिबट्या अथवा अन्य श्वापद मनुष्यवस्तीत शिरल्यावर त्याला सुखरूप पकडण्यासाठी भुलीचे औषध देणारी बंदूक वापरता येणे शक्‍य होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT