Karad Shiv Sena Melava esakal
सातारा

भास्कर जाधवांसमोरच सांगलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जोरदार राडा; माजी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याच्या लगावली श्रीमुखात

चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेमंत पवार

सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे.

कऱ्हाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली आज कऱ्हाड (जि. सातारा) येथे झाला. त्या मेळाव्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली.

चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याला शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा, सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आज घेण्यात आला. या मेळाव्यासाठी पक्षाचे विभागीय संपर्क नेते आमदार जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी कानमंत्र देण्यात आला.

मेळाव्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांच्यात पक्ष वाढीच्या प्रश्नावरुन आणि अन्य कारणावरुन आमदार जाधव यांच्यासमोरच जोरदार वादावादी झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. शिवसेनेच्या सांगलीतील विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी संबंधितांची मनधरणी केली. मेळाव्यात घडलेल्या प्रकाराला शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेच्या सांगलीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात झालेल्या राड्याचीच चर्चा जोरात सुरु आहे.

पक्ष काय कारवाई करणार?

सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे. त्याचे पर्यावसन वादावादीवरुन मारामारीत झाले आहे. पक्ष वाढीसाठी हे वातावरण योग्य नसल्याचे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सांगलीतील या वादावर पक्ष म्हणून नेते काय कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT