Satara Latest Marathi News 
सातारा

काटेवाडीत काळजावर दगड ठेवून शेतकऱ्यांनी कोबीच्या उभ्या पिकात सोडली मेंढरे

केशव कचरे

बुध (जि. सातारा) : गेल्या काही दिवसांपासून कोबी व टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने भाजीपाला उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोबी, टोमॅटो व फ्लॉवरला किलोस दोन ते तीन रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. भाजीपाला काढणीचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक काढणी थांबविली आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतात मेंढरे चरावयास सोडली आहेत. 

उत्तर खटाव परिसरातील डिस्कळ, पसूचामळा, शिंदेवाडी, बुध, काटेवाडी, करंजओढा, ललगुण, नागनाथवाडी आदी गावांतील शेतकरी विहिरीच्या पाण्यावर वर्षभर वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाज्यांची लागवड करतात. सध्या सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. टोमॅटोची निदान दोन-तीन रुपये दराने विक्रीतरी होत आहे. परंतु, कोबीची अवस्था याहून बिकट झाली आहे. 

बाजारात कोबीला मागणी नसल्याने कोबी आणू नका, अशी सूचनाच व्यापाऱ्यांकडून होत असल्याने कोबीत जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही. उत्पादन खर्च तर दूरच तोडणीचा खर्चही निघत नसल्याने डिस्कळ, बुध, काटेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून कोबीच्या उभ्या पिकात मेंढरे चरावयास सोडली आहेत. दरम्यान, शेतमाल आणि कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले असल्याची माहिती टोमॅटो उत्पादक संतोष कोरडे, कोबी उत्पादक शिवाजी कोरडे यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT