cyber crime cell phone pakistani numbers
cyber crime cell phone pakistani numbers sakal
सातारा

सातारा : आसनगावच्या सैनिकाची साडेसात लाखांची फसवणूक

सकाल वृत्तसेवा

नागठाणे : सुटीनिमित्त आसनगाव ता. सातारा येथे गावी आलेल्या सैनिकाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला. त्यात अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातील साडेसात लाख रुपये काढले. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद शंकर पवार (वय २३) या सैनिकाचे नाव आहे. प्रमोद पवार हे तीन वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावीत आहेत.

आसनगाव येथे घर बांधावयाचे असल्यामुळे ते सध्या सुटीवर गावी आले आहेत. घर बांधण्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतापगंज शाखेतून ११ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. त्यापैकी दीड लाख रुपये बांधकाम व्यावसायिकाला दिले. दोन लाख रुपये दुसऱ्या बँकेच्या कर्जापोटी भरले. त्यांच्या खात्यात साडेसात लाख रुपये शिल्लक होते.

गुरुवारी सकाळी ते घरी असताना क्रेडिट कार्डपोटी २८ हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरला फोन केला असता त्यांना एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यांना बँकेचा खाते क्रमांक विचारण्यात आला. तो सांगितल्यावर पाच मिनिटांतच त्यांच्या मोबाईलवर कपातीचे मेसेज पडले.

या वेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या खात्यातून काही मिनिटांतच टप्प्याटप्प्याने साडेसात लाख रुपये काढून घेतले. पैसे कपात केल्याचे लक्षात येताच त्यांनी सातारा सायबर सेलकडे धाव घेत माहिती दिली. या वेळी त्यांचे पैसे हे कर्नाटका बँकेच्या खात्यात वर्ग झाल्याचे सांगण्यात आले. प्रमोद पवार यांनी सातारा येथील कर्नाटका बँकेशी संपर्क साधला. तेथे त्यांना पैसे तेथूनही दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी बोरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT