shivendrasinh raje bhosale  sakal media
सातारा

दबाव टाकून संचालक झालेल्यांना घरी बसवा; शिवेंद्रसिंहराजें

उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून टीका

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी यावेळेस मतदान करावे. केवळ जागा अडविण्यासाठी आणि सातारा जिल्हा बँक ही देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून मला तेथे गेले पाहिजे, यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आज अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांच्याशी ‘सुरुची’ या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी आमदार म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे सातारा जिल्हा बँकेत भाऊसाहेब महाराजांच्यानंतर संचालक व अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली पाच वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालले. देशात व राज्यात बँक कायम एक नंबरला राहिली आहे. यावेळच्या निवडणुकीत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे असे मिळून पॅनेल होत आहे.

त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनेलचा विजय होणार आहे. कोणी किती टीका, टिप्पणी करू देत, कोणी काहीही करू देत, काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलचा विजय होणार आहे.’’ बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच यावेळी सभासदांनी मतदान करावे, असे आवाहन करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘केवळ जागा अडविण्यासाठी आणि जिल्हा बँक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून मला तेथे गेले पाहिजे, यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका त्यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली.

उदयनराजेंचा निर्णय शरद पवार घेणार

सर्व इच्छुकांना अर्ज दाखल करण्यास नेत्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत. एकदा जागा वाटप झाल्यानंतर त्या- त्या तालुक्यातील कोणाचे अर्ज ठेवायचे, कोणाचे मागे घ्यायचे, याबाबत निर्णय होईल, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले. उदयनराजेंना घेऊन पॅनेल होणार काय, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘उदयनराजेंचा निर्णय खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे करतील. मी त्यांचा निर्णय करण्याचा प्रश्नच येत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT