Bandatatya Karadkar google
सातारा

ठरल्याप्रमाणे बंडातात्या आळंदीत पोहचतील : विलासबाबा जवळ

किरण बाेळे

फलटण : ह.भ.प बंडातात्या क-हाडकर हे फरारी झालेत अशा स्वरुपाचे वृत्त सातारा जिल्ह्यात पहाटेपासून अनेकांच्या माेबाईलवर धडकले. तात्या फरार झालेले नसून ते पठारावर गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (satara-breaking-news-bandatatya-karadkar-abscond-its-fake-says-supporters)

तात्या मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नियोजित कार्यक्रमासाठी पिंप्रद (ता. फलटण) येथील त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस तिथे पोहचले परंतू तत्पुर्वीच तात्या तेथून बाहेर पडले होते.

आषाढी वारीच्या पायी वारीसाठी दोन जुलै रोजी वारकऱ्यांनी आळंदीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर यांनी नुकतेच केले हाेते. त्यानंतर ते फरार झालेत. गायब झालेत असे सर्वत्र पसरले आहे.

दरम्यान हे वृत्त निराधार असल्याचे त्यांच्या शिष्यगणातून सांगण्यात येत आहे. त्यांना एकांत प्रिय असल्याने ते वाल्मिक पठारावर गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी सोशल मिडियावर तात्यांबाबत सुरु असलेली उलट सुलट चर्चा थांबवावी असे आवाहन केले आहे.

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांच्या माध्यमातून साेशल मिडियावर पाठविण्यात येत असलेला संदेशात ते म्हणतात सर्व वारकरी बंधु-भगिनी व आदरणीय बंडातात्या कराडकर यांच्यावर प्रेम करणार्‍या सर्व युवकांना सप्रेम जयहरि. आदरणीय तात्या महाराज गायब झाल्याच्या बातम्या येत आहेत म्हणून कोणीही घाबरून जावू नका. आदरणीय तात्या ज्यावेळी त्यांच्या आवडत्या एकांतात वाल्मिकी पठार(पाटण) या ठिकाणी जातात. त्यावेळी तेथे मोबाईल रेंज नसते. यामुळे ते बहूदा मोबाईल बरोबर घेवून जात नाहीत. आत्ताही ते याच आवडत्या ठिकाणी आहेत. दाेन जुलैला या दिवशी ठरल्या प्रमाणे आळंदीत पोहचतील.

सर्व कार्यकर्ते व वारकरी बंधु-भगिनींनी ठरल्याप्रमाणे नियोजीत वेळेत पायी वारीला यायचे आहे असे आवाहनही विलासबाबा जवळ यांनी आपल्या संदेशातून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT