Maan Crime esakal
सातारा

सातवीत शिकणारी मुलगी सात महिन्यांची गरोदर; चुलत भावासह दोघांना अटक

रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण तालुक्यातील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणारा तरुण, तसेच नात्यातील अल्पवयीन मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार (Harassment) केला असून पीडिता गरोदर (Pregnant) राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील दोषींना ताब्यात घेण्यात आले असून सदर घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ माजली आहे. (Satara Breaking News Cousin Brother Troubles Sister Maan Crime)

माण तालुक्यातील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणासह नात्यातील अल्पवयीन मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.

याबाबतची माहिती अशी, माण तालुक्यात एका गावातील एका वस्तीवर पीडिता आपल्या कुटुंबीयांसमवेत राहते. जुलै २०२० मध्ये सदर पीडिता घरात एकटी असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिला धमकी देवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी पीडितेसोबत जबरदस्तीने शरीरसंबध ठेवले. तसेच सदर प्रकरणाची माहिती मिळालेल्या नात्यातील अल्पवयीन मुलानेही पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. त्यानेही तिला ब्लॅकमेल करुन जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. सदर प्रकार जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२० दरम्यान सुरु होता.

दोन्ही दोषींनी वारंवार जबरदस्तीने ठेवलेल्या शरीरसंबंधांमुळे पीडितेला दिवस गेले. ती मुलगी सहा ते सात महिन्यांची गरोदर असताना सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर याबाबतची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर आरोपींविरुद्ध बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा (Pocso crime) नोंद करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली, तर विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले. आज एकोणीस वर्षीय आरोपीस सत्र न्यायालय वडूज यांच्यासमोर हजर केले असता, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर विधीसंघर्षग्रस्त बालकास बाल न्याय मंडळासमोर उपस्थित केले असता, बाल न्याय मंडळाने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्याबाबत आदेश केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी दहिवडी पोलीस ठाण्यास भेट देवून घटनेची माहिती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Satara Breaking News Cousin Brother Troubles Sister Maan Crime

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री Epstein Files केल्या जारी; १२०० पीडित मुली, ३५०० फाइल्स, हजारो फोटो, DVD आणि कागदपत्रं

Shashikant Shinde : अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही; आघाडीबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्टीकरण

Kidney Trafficking: आणखी तिघांची किडनी काढली; मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटचा देशभर विस्तार, पोलिस डॉक्टरच्या मागावर

Pune Municipal Election : प्रचार सभेसाठी लागणार शुल्क; पुणे महापालिकेकडून दर निश्‍चित

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

SCROLL FOR NEXT