Minor Girl esakal
सातारा

घरी अभ्यासाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेडछाड

हेमंत पवार

तारळे (सातारा) : पाटण तालुक्यातील (Patan Taluka) नववीत शिकणाऱ्या मुलीची त्याच गावातील एकाने छेडछाड केली. शिवाय अंगाशी झटत लगट केल्यामुळे त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) (Pocso Crime) अंतर्गत उंब्रज पोलिसात (Umbraj Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीने आपल्या आजी व वडिलांसोबत पोलिसात फिर्याद दिली आहे. सूरज रत्नकांत कांबळे असे संशयिताचे नाव असून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Satara Breaking News Police Arrested Youth Troubled Minor Girl Patan)

29 एप्रिला सायंकाळी सात वाजता मोबाईलवर अभ्यास आला होता, तो करण्यासाठी घरात रेंज येत नसल्याने संबंधित मुलगी घराबाहेर आली होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : 29 एप्रिला सायंकाळी सात वाजता मोबाईलवर अभ्यास (Online Study) आला होता, तो करण्यासाठी घरात रेंज येत नसल्याने संबंधित मुलगी घराबाहेर आली होती. त्यावेळी टोपण नावाने हाक मारीत गावातील सूरज रत्नकांत कांबळे हा दारू (Alcohol) पिलेल्या अवस्थेत आला. त्याने संबंधित मुलीच्या अंगाशी झटापट करून तीचा लैंगिक अत्याचार केला.

सोडवायला गेलेल्या आजीसही संबंधीताने मारहाण केली, अशी तक्रार आजीने पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून संशयितास अटक केली असून त्यास आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील तपास करत आहेत.

Satara Breaking News Police Arrested Youth Troubled Minor Girl Patan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT