mla mahesh shinde sakal
सातारा

Satara आमदार महेश शिंदे : निगडी वंदन येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

सर्वसामान्य जनतेने अशा भूलथापांनी मत मिळवणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर देत घरी बसविले. यापुढे आपण मनोज घोरपडेंच्या साथीने या गावासाठी व पर्यायाने संपूर्ण मतदारसंघासाठी विविध विकासात्मक योजना मार्गी लावण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

सकाळ वृत्तसेवा

अंगापूर- भूलथापा देऊन, फसवणूक करून निवडून येणाऱ्यांना जनतेने वेळीच धडा देत घरी बसविले. केवळ लोकांची दिशाभूल करून निवडून येता येते; पण शाश्वत विकास करता येत नाही, असे मत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी निगडी वंदन येथे व्यक्त केले.

निगडी वंदन (ता. सातारा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, संदीप शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या

उपस्थितीत येथे रस्ता कॉँक्रिटीकरण, दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत खडीकरण व डांबरीकरण, तसेच चिंचणी येथील अंतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरण व बंदिस्त गटार या कामांचे भूमिपूजन झाले.

आमदार शिंदे म्हणाले, की हे गाव लोकसंख्येने लहान असले, तरी येथील नागरिक सुज्ञ आहेत; पण या अगोदरच्या आमदारांनी लोकांना विकासकामांचा डोंगर उभा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी लोकांची दिशाभूल करत गावाला मूलभूत विकासापासून दूर ठेवण्याचे पाप केले असल्याने आज सर्वसामान्य जनतेने अशा भूलथापांनी मत मिळवणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर देत घरी बसविले.

यापुढे आपण मनोज घोरपडेंच्या साथीने या गावासाठी व पर्यायाने संपूर्ण मतदारसंघासाठी विविध विकासात्मक योजना मार्गी लावण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.कार्यक्रमप्रसंगी निगडीचे सरपंच संतोष मांडवे, चिंचणीचे सरपंच आकाश घमरे, विलासराव शेडगे, विश्वास शेडगे, किरण येवले, रमेश कणसे, कृष्णत शेडगे, संतोष कणसे, अमोल कणसे, संदीप मांडवे, दत्ता मोरे, दीपक मांडवे, रफीक शेख हे उपस्थित होते. जयवंत जाधव यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. आनंदराव मांडवे यांनी प्रास्ताविक, तर विलासराव मांडवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT