Satara 
सातारा

घंटागाडी चालकांबाबत तक्रारी, कोळकीत माहिला वर्ग आंदोलनाच्या पावित्र्यात

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : येथील मालोजीनगरात गेले दोन दिवस घंटागाडी आली नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या घंटागाडी चालकाच्या मनमानी कारभारामुळे अनेक तक्रारी वाढू लागल्या असून, महिला वर्ग आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. 

पहाटे पावणेसहाच्या दरम्यान घंटागाडी सुरू होते. पहाटे अंधार असल्याने बराचसा महिला वर्ग घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यासाठी बाहेर येत नाही. पर्यायाने असा कचरा घराच्या कंपाउंडच्या बाहेर व परिसरात टाकला जातो. असा कचरा वेळोवेळी साठल्याने परिसरामध्ये दुर्गंधी सूटत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. घंटागाडी एका दिवसाआड ऐवजी दररोज आली पाहिजे. घंटागाडी सकाळी आठ वाजता सुरू केली, तर हा प्रश्न मार्गी लागेल, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

बऱ्याच वेळा घंटागाडीला पाठीमागे पत्रा लावला जात नसल्यामुळे प्लॅस्टिक कचरा सगळ्या रस्त्याने सांडत जातो. तेव्हा घंटागाडीला पाठीमागे पत्रा लावणे ग्रामपंचायतीने बंधनकारक केले पाहिजे. या घंटागाडीवर लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासंबंधी निवेदन केले जाते. मात्र, कोणत्याही घंटागाडीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठी सोय केलेली नाही. घंटागाड्यांवर हिंदी चित्रपटांमधील गाणी मोठमोठ्याने लावायला सुरुवात केली आहे. याविरुद्ध ग्रामपंचायतीकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल आजपर्यंत घेतली 
गेलेली नाही.

अनेक वेळा घंटागाडी चालक स्वतःच्या सोयीनुसार मार्ग 
बदलत असल्यामुळे पुढे कचरा घेऊन थांबलेल्या महिलांना घंटागाडी माघारी येईपर्यंत बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी या समस्येत लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT