Satara
Satara 
सातारा

कोयना विभागात कोरोनाचा गुणाकार सुरू, कंटेनटमेंट झोन जाहीर

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना विभागात कोरोनाने एकाचवेळी चार जणांना बाधित करून गुणाकार सुरू केला आहे. कोयना विभागात सध्या कोरोनाचा गोवारे "इफेक्‍ट' सुरू आहे. घरवापसी करणाऱ्या एका बाधितामुळे कोयना विभागात पाच बाधित सापडले आहेत. यामुळे "डेंजर झोन'मधील कोयना विभागातील जनतेच्या जिवाला घोर लागला आहे. प्रशासनाने कोयनानगर येथील जुने (खालचे) मार्केट परिसरात कंटेनटमेंट झोन 
जाहीर करून परिसर सील केला आहे. 

राज्य अनलॉक झाल्यापासून कोयना विभागात दहा हजारांपेक्षा जादा मुंबई, पुणे या ठिकाणी असणारी जनता आपल्या गावी आली आहे. शिरवळपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रवास कराटे, गोवारे या गावातून थेट कोयनानगरमध्ये झाला आहे. याला ट्रॅव्हल हिस्ट्री जबाबदार आहे. 

गोवारेतील बाधिताच्या मृत्यूनंतर कोयना विभागात कोरोनाचा गुणाकार सुरू झाला आहे. गोवारे मृतांच्या संपर्कात आलेले गोवारे येथील तीन, कराटे, कोयनानगर व धामणी येथील प्रत्येकी एक बाधित झाले आहेत. गोवारे येथील बाधित क्वारंटाइन असताना त्याच्यावर आरोग्य यंत्रणेकडून वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पाटण तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण कोयना विभागात सर्वात जास्त सापडत आहेत. 

कोयनानगर येथील खालच्या मार्केटमध्ये बाधित रुग्ण सापडल्याने बाजारपेठेत व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवली आहे. केवळ या परिसरात प्रशासनाने कंटेनटमेंट झोन जाहीर केला आहे. हाकेच्या अंतरावर असणारे वरचे नवीन मार्केट या बंदीतून वगळल्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT