man 
सातारा

माण तालुक्‍यात कोरोनाचे "शतक'

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून कोसो दूर असणाऱ्या माण तालुक्‍यात आज कोरोनाबाधित रुग्णांनी शतक गाठले. 34 गावांमध्ये शंभर रुग्ण सापडल्याने प्रशासनासह सामान्य जनतेत चिंतेचे वातावरण आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने अडीच हजारांचा टप्पा गाठला असतानाच माण तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत तालुक्‍यातील 34 गावांमध्ये 100 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. माण तालुक्‍यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असल्याने सामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे. 

लॉक-अनलॉक-लॉक असे धोरण राबविणाऱ्या शासनाला लॉकडाउननंतर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात येणे अपेक्षित होते. मात्र, रुग्णसंख्या आटोक्‍यात येण्याऐवजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 24 जूनला सकाळी माण तालुक्‍यातील कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यूपश्‍चात अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 70 जण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 25 कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

माणमधील जवळपास एक तृतीयांश गावात कोरोना रुग्ण आढळून आले. दहिवडी, म्हसवड, गोंदवले बुद्रुक, खडकी-पाटोळे, आंधळी ही गावे कोरोना हॉटस्पॉट बनू लागली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला असून, मागील 15 दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. सुरुवातीला बाहेरून आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित आढळत होत्या. मात्र, सध्या बाहेरून आलेल्या व्यक्तींपेक्षा निकट संपर्कातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांनी शंभरी गाठल्यामुळे तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडलेली गावे... 
दहिवडी, म्हसवड, खडकी-पाटोळे, गोंदवले बुद्रुक, दोरगेवाडी, वडजल, राजवडी व वरकुटे-मलवडी, लोधवडे, पिंपरी, मार्डी, आंधळी, भालवडी, शिरताव, नरवणे, काळेवाडी, इंजबाव, विरळी, परतवडी, तोंडले, दिवड, राणंद, गोंदवले खुर्द, खोकडे, वारुगड, खंड्याचीवाडी, कुळकजाई, पळसावडे, वावरहिरे, दानवलेवाडी, पळशी, मोगराळे, कारंडेवाडी व बिदाल. 


या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. जनतेने काळजी घेण्याची, तसेच घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. 

- अश्‍विनी जिरंगे, प्रांताधिकारी, माण 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT