coronavirus update 
सातारा

साता-यात काेराेनाचा कहर सुरुच

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात आज (बुधवार) नव्याने 804 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सतत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात वाढती साखळी तुटत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढताना दिसत आहे. (satara-coronavirus-update-840-patients-increased-karad-phaltan-khatav)

याचबरोबर, संस्थात्मक विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट कमी झाला असल्याने दिसून येत आहे. दरम्यान, मृत्यूचे सत्र अद्यापही कमी होत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर कडक निर्बंध लावावे लागतील असे नुकतेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 10 हजार 687 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये 804 बाधित आढळले आहेत. दरम्यान मंगळवारी (ता.29) सायंकाळी जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 873 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दिव्यांगांच्या लसीकरणास प्रारंभ

दरम्यान दिव्यांगांसाठी प्रशासनाने मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिव्यांगांच्या जवळच्या ठिकाणी जावून लसीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच त्यांच्यासाठी महिन्यातून एकदा किंवा दोन विशेष मोहिमचे आयोजन करुन लसीकरण करण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.

दिव्यांगांच्या सोयीसाठी त्यांच्या घराजवळ जावून लसीकरण करण्यात येणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये दुसरी लसही घ्यावी. लस घेतल्यानंतरही सर्वांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. दोन मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिव्यांगांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एक कार्यक्रम तयार करुन त्यांच्या घराजवळ लावून लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT