सातारा

सातारा : जिल्हा रुग्णालयात मशिनअभावी मंदावतोय कोरोना तपासणीचा वेग

प्रवीण जाधव

सातारा : जिल्हा रुग्णालयातील ट्रूनॅट मशिनचा सध्या निगेटिव्ह रुग्ण शोधण्यात उपयोग होत असला तरी, पॉझिटिव्ह रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पुन्हा पुण्याला पाठवावा लागत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण तातडीने सापडण्यासाठी स्वॅब
तपासणीला आरटीपीसीआर मशिनची जिल्हा रुग्णालयात उपलब्धता होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी होणे आवश्‍यक असल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे. त्यासाठी राज्यामध्येही कोरोना तपासणीच्या प्रयोगशाळा वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. सध्या कोरोना
रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांच्याही मोठ्या प्रमाणावर तपासण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे अहवाल येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात आहे. तोपर्यंत रुग्णांवर वेगाने उपचार सुरू करता येत नाहीत. त्यामळे रुग्णांचे तातडीने निदान आणि उपचार होण्यासाठी जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाला कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली. 

जिल्हा रुग्णालयातही या तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्यानुसार ट्रूनॅट हे अद्ययावत मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनद्वारे चाचण्या करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, तसेच नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिलेली आहे. नागपूर येथील एम्सच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाच्या प्रा. डॉ. मीरा शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील सुविधा, मशिन आणि या चाचण्यांसाठी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले प्रशिक्षण आदींचा आढावा आणि गुणवत्तेची तपासणी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात ट्रूनॅट मशिनद्वारे
कोरोनाच्या चाचण्या करण्यास मान्यता देण्यात आली. 

परंतु, हे मशिन केवळ रुग्णांच्या स्क्रिनिंगसाठी उपयोगात येत आहे. या मशिनवर केलेल्या तपासणीत एखादा रुग्ण निगेटिव्ह आढळला आणि त्याचा स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविल्यास त्या अहवालात काही बदल झाला, असे आजवर तरी समोर आले नाही. त्यामुळे रुग्ण निगेटिव्ह आहे, हे ग्राह्य धरण्यास या मशिनची तपासणी उपयुक्त ठरते आहे. परंतु, पॉझिटिव्ह अहवालाबाबत या मशिनच्या तपासणीवर 100 टक्के विसंबून राहता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथील मशिनच्या तपासणीत पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचा पुन्हा स्वॅब घेऊन तो तपासणीला पुण्याला पाठवावा लागतो. अशा प्रकारे रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेंचा या मशिनवर स्वॅब घेण्यात आलेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु, पुन्हा स्वॅब घेऊन नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. तर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका रुग्णाचे दोन अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरी सोडले. परंतु, पुन्हा दाखल केल्यानंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही काही वेळा काय निर्णय
घ्यायचा, याबाबत संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती तयार होत आहे. 

तातडीने अहवालाचा मुख्य उद्देश असफल 

ट्रूनॅट मशिन बसविताना या मशिनद्वारे गंभीर रुग्णांच्या चाचण्या तातडीने करून त्यांचे अहवाल लवकर मिळवणे जिल्हा रुग्णालयातील यंत्रणांना शक्‍य होईल, असे अपेक्षित होते. या मशिनद्वारे एका दिवसाला 35 ते 40 चाचण्या करता येतील. त्यामुळे अहवाल लवकर मिळतील, असा मुख्य उद्देश होता. परंतु, पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल पुन्हा तपासणीसाठी पाठवावे लागत असल्याने वेळेची बचत होईल, या उद्देशाची पूर्तता होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयाचे अन्य प्रयोगशाळेतील तपासणीवरील अवलंबित्व कायम राहिले आहे. हे टाळण्यासाठी अहवालामध्ये जास्त अचुकता असलेले आरटीपीसीआर मशिन जिल्हा रुग्णालयासाठी तातडीने उपलब्ध करून घेणे आवश्‍यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT