Satara Latest Marathi News 
सातारा

हिंगणेत युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; वडूजसह म्हसवडातील 13 जणांवर गुन्हा

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : हिंगणे (ता. खटाव) येथील युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली. अजय चंद्रकांत यादव (वय 42) असे मृताचे नाव आहे. खटाव, माण तालुक्‍यांतील काही गावांतील एकूण 13 लोकांना उसने दिलेले 19 लाख 95 हजार रुपयांची रक्कम परत देण्यास टाळाटाळ, दमदाटी, शिवीगाळ व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवित त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मृताचे वडील व सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी चंद्रकांत दत्तू यादव यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. या आधारे 13 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत चंद्रकांत यादव यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, यादव कुटुंबीय हिंगणे येथे शेती व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. तडवळे रस्त्यानजीक असणाऱ्या जोतिबा मंदिर परिसरात त्यांनी शेतातच घर बांधले होते. या घरानजीकच्या लिंबाच्या झाडास अजयने काल गळफास घेतला. मृत अजय हा शेतीबरोबर पशुपालन, वाहन व इतर व्यवसाय करीत होता. व्यवसायाच्या निमित्ताने वाहन खरेदी व इतर देवाण- घेवाणीवरून त्याचे अनेक जणांशी व्यवहार झाले होते. 

यापैकी काहींनी त्याची आर्थिक फसवणूक करण्याबरोबर जीवे मारण्याची धमकी दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार वडील चंद्रकांत यादव यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार इम्रान सिकंदर बागवान, सुनील रामचंद्र गायकवाड, धनाजी पाटोळे, विश्वास बागल, बाळू मासाळ, जालिंदर चंद्रकांत खुडे (सर्व रा. वडूज), विलास दादासाहेब शिंगाडे कातरखटाव, रवींद्र आनंदराव राऊत गणेशवाडी, वैभव संभाजी पवार हिंगणे, पिनू पवार उंबर्डे, चंद्रकांत जगदाळे पेडगाव, अमित पिसे, अमोल कलढोणे (दोघे रा. म्हसवड) या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT