Satara Latest Marathi News 
सातारा

मालकाच्या घरातच चोरी करणारा जेसीबी चालक गजाआड; पाचगणी पोलिसांची महाबळेश्वरात कारवाई

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील बांधकाम व्यावसायिकाच्या जेसीबीवर चालक असणाऱ्यानेच रोख रक्कम व वस्तू चोरून पोबारा केल्याचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सहा तासांतच संशयिताला गजाआड केले.
 
याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहितीनुसार फिर्यादी प्रशांत अशोक मोरे यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून गणेश सहदेव नाईक (रा. हुडको कॉलनी, विजापूर, कर्नाटक) हा काम करीत होता. गणेश याने मोरे यांच्या मोटारसायकलच्या डिकीतून रात्रीच्या वेळी 15 हजार रुपये रोख रक्कम व गॅस रेग्युलेटर आणि अन्य वस्तू घेऊन पळून गेला. 

त्याचा शोध त्यांनी घेतला; परंतु तो न सापडल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिस हवालदार रसाळ, पोलिस नाईक कांबळे व पोलिस शिपाई कदम यांनी तांत्रिक तपास करून सीसीटीव्ही पाहून शिरवळ (ता. खंडाळा) येथे गणेश असल्याची माहिती मिळवली. शिरवळ परिसरामध्ये शोध घेऊन काही तासांतच त्यास पकडले. सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही कामगिरी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT