सातारा

तांब्याच्या तारेची चोरीसाठी कवठे परिसरात सलग पाचवा ट्रान्स्फॉर्मर फाेडला

पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) ः अनवडी (ता. वाई) येथील महावितरणचा ट्रान्स्फॉर्मर फोडून त्यातील ऑइल व तांब्याचा तारा चोरून नेल्या. गेल्या तीन आठवड्यांपासून कवठे परिसरात ट्रान्स्फॉर्मर फोडणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. यापूर्वी ओझर्डे, वेळेतील प्रत्येकी एक व सुरूर येथील दोन अशा एकूण पाच ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड करून चोरी करण्यात आली आहे. ट्रान्स्फॉर्मरच्या वाढत्या चोऱ्यांमुळे महावितरणचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
अनवडी येथील वर्दळीच्या पुणे- बंगळूर महामार्गावरील सेवारस्त्या नजीकच्या ट्रान्स्फॉर्मरची रात्री चोरट्यांनी मोठी तोडफोड केली. ट्रान्स्फॉर्मरचे सर्व लोखंडी साहित्य तोडून, त्यातील ऑइल व तांब्याचा तारा चोरून नेल्या.

त्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड करून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. भुईंज पोलिस स्टेशनपासून नजीकचे व आसपासचे महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणचे ट्रान्स्फॉर्मर फोडून चोरटे चोरी करू लागल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. 

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी कऱ्हाडात एल्गार; मोदी सरकारविरोधात शनिवारी आंदोलन

एक दाेन नव्हे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून चाेरांनी मारला तांब्याच्या तारांवर डल्ला

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT