Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

लग्न होत नसल्याने नागठाण्यात नैराश्‍येतून टेलरची आत्महत्या

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : येथील एकाने नैराश्‍येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. योगेश सूर्याजी मगर (वय 44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मगर हे त्यांच्या आईसोबत नागठाणे येथे राहत होते. त्यांचे गावातच मुख्य बाजारपेठ रस्त्यावर टेलरिंगचे दुकान होते. झोपण्यासाठी ते नेहमी रात्री दुकानातच असत. लग्न होत नसल्याने काही काळापासून ते नैराश्‍यात होते. त्यातच त्यांना दारूचे व्यसन लागले होते.

शनिवारी दिवसभर घरी न आल्यामुळे त्यांची आई रात्री उशिरा दुकानात गेली. दुकानाचे शटर उघडून पाहिले असता योगेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद चंद्रकांत साळुंखे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली. हवालदार प्रशांत महाडिक पुढील तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT