Satara Latest Marathi News 
सातारा

पेरलेत कार-दुचाकीच्या धडकेत इंदोलीच्या युवकाचा मृत्यू; मिरजेतील कारचालकाविरुध्द गुन्हा

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर पेरले (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत इंदोली फाटा येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात 37 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. 20) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दत्तात्रय नारायण जाधव (वय 37, रा. इंदोली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, दत्तात्रय नारायण जाधव इंदोली येथे सुरू होणाऱ्या उड्डाणपूल कामाच्या ठिकाणी सिक्‍युरिटी गार्ड म्हणून सहा महिन्यांपासून कामास होता. शनिवारी तो त्याच्या दुचाकीने इंदोलीवरून उंब्रज बाजूकडे कामावर जाताना पेरलेच्या हद्दीत महामार्गावर सातारा ते कऱ्हाड जाणाऱ्या लेनवर इंदोली फाटा येथे पुणे बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दत्तात्रय जाधव गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला, तसेच कार झाडावर जाऊन आदळली. 

अपघातात कारमधील एक जण जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत मृत दत्तात्रय जाधव यांचा भाऊ नितीन पंढरीनाथ जाधव (रा. इंदोली) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात कारचालक मनोज विश्वनाथ पाटील (रा. कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा अपघात भरधाव वेगात निष्काळजीपणाने व बेदरकारपणे कार चालवून झाल्याने माझा चुलत भाऊ अपघातात ठार झाल्याचे म्हटले आहे. यावरून कारचालक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT