Satara 
सातारा

कऱ्हाडला शेतकऱ्यांसमोर कोरोना विषाणूसोबत लोकरी माव्याचे संकट

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनापाठोपाठ आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर उसावरील लोकरी माव्याचे मोठे संकट उभे आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना हा मावा धुवून जाण्यासाठी मोठ्या पावसाची उपेक्षा आहे. मात्र, पावसानेही दडी माडल्याने शेतकऱ्यांना आता नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. वेळेत हा मावा आटोक्‍यात न आल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता कृषी विभागही बांधावर पोचून शेतकऱ्यांना त्यासंदर्भात जनजागृती करत आहे. 

सध्या कोरोनाने गावोगावी चिंतेचे वातावरण आहे. त्यात शेतकरीही भरडला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांतही त्याची चांगलीच धास्ती आहे. त्यातच आता शेतकऱ्यांचे मागे लोकरी माव्याचे संकट येऊन उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना लोकरी मावा नवीन नाही. मागील काही वर्षांपासून शेतकरी त्याचा सामना करत आहेत. यंदा मात्र त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे त्याची वाढ झपाट्याने होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे उसावरील लोकरी माव्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने आता संबंधित माव्याच्या मुकाबल्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे माव्याचा हा प्रादुर्भाव कमी होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांनी आवश्‍यक त्या उपाययोजना राबवून लोकरी माव्याचा नायनाट करावा, यासाठी आता उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्यासह मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

सध्या जुलै महिना संपत आला तरीही पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पाण्याचेही संकट आहे. त्यातच मोठा पाऊस होत नसल्याने हा मावा धुवून जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. मात्र, पावसानेही दडी माडल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोकरी मावा वेळेत आटोक्‍यात न आल्यास ऊस पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

लोकरी माव्याच्या नायनाटासाठी आता नैसर्गिक मित्र कीटकांचीही वाढ शिवारात होऊ लागली आहे. शेतकऱ्यांनी जर अतिरिक्त कीटकनाशकांची फवारणी केली तर ते मित्र कीटकही मरून जातील, असा धोका कृषी विभागाला जाणवत आहे. त्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानेच कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन केले आहे. 


""शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना केल्यास लोकरी मावा नियंत्रणात येऊ शकतो. त्यासाठी कृषी विभागामार्फतही शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अधिकारी, कर्मचारी जनजागृती करत आहेत.'' 
-मनोज वेताळ, 
उपविभागीय कृषी अधिकारी, कऱ्हाड 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT