सातारा

त्या दोन डॉक्टरांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा

सातारा : बदलीच्या निमित्ताने एका ऑडिओ क्‍लिपच्या माध्यमातून चव्हाट्यावर आलेल्या आरोग्य यंत्रणेतील खदखदीची आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिवतापचे सहायक संचालक जोशी यांनी जिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

डॉ. श्रीकांत भोई यांच्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. अमोद गडीकर यांनी पदभार स्वीकारला. डॉ. भोई यांच्या काळात आरोग्य यंत्रणा म्हणजे आओ जावो घर तुम्हारा... अशी अवस्था होती. त्यामुळे कोणाला काही त्रास नव्हता. डॉ. गडीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपली कार्यपद्धती वेगळी असल्याचे दाखवायला सुरुवात केली. सर्वांनी सर्व काही सरळ रेषेतच काम केले पाहिजे. मीही सरळपणेच काम करणार असा काहीसा पवित्रा होता; परंतु सर्वांना एक समान हे धोरण प्रत्यक्षात तसे नसल्याचे अनेकांना जाणवू लागले. 

एकाला एक व दुसऱ्याला दुसरा न्याय यायला लागला. त्यातच जिल्हा रुग्णालयामध्ये लाचखोरीचे प्रकरण समोर आले. त्या वेळी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराबाबत असलेला असंतोष तीव्रतेने समोर आला. त्यानंतर डॉ. गडीकर रजेवर गेले होते. त्यामुळे रुग्णालयात उफाळलेला हा असंतोष कमी झाला होता. दोन महिन्यानंतर गडीकर कामावर हजर झाले; परंतु कार्यपद्धतीत हवा तसा बदल न झाल्याने असंतोष वाढतच गेला. त्याचा भडका चार दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोबाईल संभाषणातून झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वरिष्ठांसोबत झालेले संभाषण व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत गेले. त्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. 

त्यामध्ये गडीकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेण्यात आले होते. त्याचबरोबर पैसे घेऊन बदल्या करत असल्याचे, तसेच पैसे न देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्रास देण्याचाही आरोप झाला होता, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक
संतुलन ढासळवत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. संभाषणाची क्‍लिप जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर फिरत होती. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. "सकाळ'नेही याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबतच्या एकंदर खदखदीबाबत तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई होणे आवश्‍यक असल्याची मागणी करण्यात आली होती. 

दरम्यान, या प्रकरणाची आरोग्य उपसंचालकांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. जोशी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी काल जिल्हा रुग्णालयात
येऊन याप्रकरणाशी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होण्याची अपेक्षा असलेले सर्वच या प्रकरणात योग्य ती कारवाई होण्याच्या अपेक्षेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT