सातारा

पीककर्ज परतफेडीबाबत सातारा जिल्हा बॅंकेने घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीककर्जाची परतफेड केलेली नाही, असे शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित आहेत. ही बाब विचारात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ऊस पीककर्ज वाटपासाठी 31 जुलैपर्यंत, तर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानुसार पीककर्ज परतफेडीस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

ज्या सभासदांनी कर्ज परतफेड केलेली नाही, अशा सभासदांनी वाढीव मुदतीचा फायदा घेऊन आपले पीककर्ज भरून नवीन पीककर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.
 
या वर्षीच्या हंगामात 30 जूनअखेर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आपली वसुलीची परंपरा कायम राखत पीककर्जाची विक्रमी 97 टक्के वसुली केली आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""जिल्ह्यात पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांची संख्या जास्त आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या वर्षीही जिल्ह्यातील शेतकरी सभासदांनी वसुलीसाठी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. चालू वसुली हंगामात पीककर्ज वसुलीसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व विकास सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्य, सचिव यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीककर्जाची परतफेड केली नाही, त्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळालेले नाही. ही बाब विचारात घेऊन जिल्हा बॅंकेने ऊस पीककर्ज वाटपासाठी 31 जुलैपर्यंत, तर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानुसार पीककर्ज परतफेडीस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.''
 
ज्या सभासदांनी कर्ज परतफेड केलेली नाही, अशा सभासदांनी वाढीव मुदतीचा फायदा घेऊन आपले पीककर्ज भरून नवीन पीककर्ज घ्यावे, तसेच कर्ज व्याज परताव्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सरकाळे यांनी केले आहे. 

...तरच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल : पृथ्वीराज चव्हाण

लॉकडाउनमध्ये मधुमेहींच्या नेत्रपटलावर दुष्परिणाम, अंधत्वाच्या प्रमाणातही वाढ, तज्ञ डॉक्‍टरांचा निष्कर्ष

डॉक्‍टरांसह कुटुंबातील सहा कोरोनाबाधित; म्हसवडकर चिंतेत 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश क्षीरसागर यांना धक्‍का :  गटनेतेपदावरून हकालपट्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT