District-Hospital-Satara sakal
सातारा

सातारा : सिव्‍हिलमध्ये उपकरण चोरट्यांना अभय

आजपर्यंत कारवाईअभावी महाभागांचे फावले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा रुग्णालयामधून रुग्णांसाठी महत्त्‍वाच्या असणाऱ्या काही यंत्रांच्या चोरीचे प्रकार समोर आले आहेत. परंतु, त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पैशांतून घेतलेल्या उपकरण चोरट्यांना अभय कोणाचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशी व्यवस्था आरोग्य विभागाने निर्माण केली आहे. त्यातही तज्‍ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुविधा, शस्त्रक्रिया, गंभीर आजारांवरील उपचार यासाठी जिल्हा रुग्णालयाचा सर्वसामान्यांना आधार असतो. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक विविध आजारांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांचा समावेश असतो. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या आधुनिक उपकरणांची सोय केलेली असते. त्यासाठी नागरिकांकडून कररूपाने मिळालेले लाखो रुपये खर्ची पडत असतात.

कोरोना संसर्गापूर्वी या सुविधांचे प्रमाण जिल्हा रुग्णालयातही कमी होते. दोन वर्षांपूर्वी आरोग्य सुविधांतील या कमतरता प्रशासन व शासनाला प्रकर्षाने जाणवल्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कायापालट म्हणता येईल, अशा पद्धतीचे आमूलाग्र बदल गेल्या दोन वर्षांत झाले. सहा बेडच्या अतिदक्षता विभागाची व्यवस्था असताना जिल्हा रुग्णालयात नव्याने ४० बेडचे अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले. त्यामुळे सहाजिकच या विभागात लागणाऱ्या अत्यावश्यक यंत्रणाही आल्या. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत शस्त्रक्रियागृहाचेही नूतनीकरण झाले. जिल्हा रुग्णालयात अशा सुविधा वाढल्यामुळे नागरिकांनाही त्याचा लाभ मिळू लागला आहे. परंतु, नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या यंत्रणांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी ही जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाची आहे. आपल्या मालकीच्या रुग्णालयाप्रमाणेच जनतेच्या मालकीच्या या रुग्णालयातील वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, त्याचे पुरेसे गांभीर्य रुग्णालय व्यवस्थापनाला असल्याचे दिसून येत नाही.

रुग्णालयात चोरीचे प्रकार वाढले आहेत. परिसरातून दुचाकींची चोऱ्या तर वाढल्या होत्याच. काही वेळा केसपेपर विभागातून पैशाचीही चोरी झाली. एक्सरे मशिन साताऱ्यातून कुठे गेले, कसे गेले, याचा थांगपत्ता प्रशासनाला नव्हता. या घटना मागील काळात घडून गेल्या. त्याबाबत ठोस कारवाया झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील काही महाभागांचे चांगलेच फावले आहे. गेल्या काही दिवसांत तर, मॉनिटर घेऊन जात असल्याची गोष्ट समोर आली. शस्त्रक्रियागृहातून यंत्र गायब झाले. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा रक्षक करतात काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच या प्रकारांना काहींचा हातभार आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्‍थिती त्यामुळे निर्माण होते.

रुग्णालयातील या समोर आलेल्या प्रकारांपेक्षा कितीतरी छोट्या-मोठ्या वस्तू गायब होत आहेत. अगदी जिल्हा शल्यचिकित्सकांचे शिक्के गायब झाले तरी, रुग्णालय व्यवस्थापनाला दुसऱ्या विभागाने निदर्शनास आणून दिल्याशिवाय समजले नाही, याला काय म्हणायचे? काही प्रकारांबाबत रुग्णालय प्रशासनाकडे लेखी म्हणणे गेले आहे. परंतु, त्यावर आजवर का कारवाई झाली नाही, असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तूंच्या चोरांना अभय कोणाचे, असा सवाल आता निर्माण झाला आहे.

ठोस कारवाईची गरज

जिल्हा रुग्णालयात प्रत्येक वस्तू ही शासनाच्या पर्यायाने जनतेच्या मालकीची आहे. त्याची देखरेख व काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर त्यांच्याकडून कडक कारवाई झालीच पाहिजे. एकाला सोडले तर, दुसरा तयार होईल. एकाला धडा शिकवला तर, बाकीचे सुधारतील, याचा विचार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT