Corona Update sakal
सातारा

सातारा जिल्ह्यात नवे दीड हजार बाधित; कोरोनाबाधितांचा संक्रमण दर २९ टक्के

कोरोनाशी सामना करत असतानाच आता ओमिक्रॉन प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित संख्येचा आलेख स्थिर असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात बाधित संख्येचा संक्रमण दर (Positivity rate) २९ टक्के आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एक हजार ५४० बाधित रुग्ण आढळले असून, एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. (Satara Corona Update)

गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाशी सामना करत असतानाच आता ओमिक्रॉन प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रशासनाला दुहेरी संकटाशी सामना करावा लागत आहे. याचबरोबर आरोग्य विभाग अधिक सतर्क होत बाधित रुग्णांचा प्रसार रोखण्यासाठी व गैरसोय टाळण्यासाठी तालुकानिहाय कोविड सेंटर सुरू केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी जास्तीतजास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या करून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न करत आहेत, तसेच हॉटस्पॉट झालेल्या ठिकाणी उपाययोजना आखण्यात भर दिला जात आहे. याचबरोबर जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. प्रशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाच हजार २४५ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामधील एक हजार ५४० बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT