लसीकरण  sakal news
सातारा

सातारा : जिल्ह्यात ८१७७ विद्यार्थ्यांना लसीकरण

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली.

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात आज १११ केंद्रांच्या माध्यमातून एकूण आठ हजार १७७ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. याचबरोबर आरोग्य विभागाने काही शाळांमध्ये जाऊन मुलांना लशींचे डोस दिले असून, या वयोगटाच्या लसीकरण चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Satara District Vaccination Updates)

देशभरात कोरोनाचे संकट कमी होत असताना ओमिक्रॉन या विषाणूने डोके वर काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर दहा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण होणार असल्याची घोषणा केली केली. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. या लसीकरणात केवळ कोव्हॅक्सिन लशींचे डोस देण्यात आले. या लसीकरणाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे एक लाख ५१ हजार १४९ मुलांना मिळणार आहे. सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात लशींचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड तीन लाख ११ हजार ५७० डोस असून, कोव्हॅक्सिनचे ९६ हजार १५० डोस आहेत. त्यामुळे लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

‘‘जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तसेच जिल्ह्यातील काही शाळांमध्येही जाऊन लसीकरण केले आहे. लशींचे डोसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरण सत्रे सुरळीत सुरू आहेत.’’

- डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT