Satara 
सातारा

पुरापासून असे करा घरांचे संरक्षण, रेठऱ्यातील आरिफ मुजावर यांचे संशोधन

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पुराच्या पाण्यापासून आपली घरे व दुकाने अगदी सोप्या पध्दतीने कशी वाचवता येतील, याबाबत येथील बांधकाम अभियंता आरिफ यासीन मुजावर यांनी संशोधनपर शोधनिबंध तयार केला आहे. हा शोधनिबंध आयआरजेईटी या आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. 

आरिफ यांनी पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून तेथेच पुढील पदव्युत्तर शिक्षण घेत त्यांनी नावीन्याचा ध्यास बाळगत पुरावेळी होणारी हानी टाळण्यासाठी साध्या व सोप्या पद्धतींचा शोधनिबंध तयार केलेला आहे. गेल्यावर्षी महापुरामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हाहाकार माजला होता. पुढील काळात अशा आपत्तीत गोरगरिबांचे नुकसान होवू नये, यासाठी त्यांच्या शोधनिबंधामधील उपाययोजना निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहेत. 

मुजावर यांनी सुचवलेल्या उपाययोजना अशा की, सर्वप्रथम आपल्या घरातील सांडपाणी व शौचालयाच्या पाइप पॅक करणे. नंतर पावसाचे पाणी गळू नये, म्हणून जो प्लॅस्टिक कागद छतावर टाकतो, त्या कागदाला घराची खिडकी व दाराजवळ खिडकी व दारापेक्षा दीड ते दोन फूट जादा कापणे. जेणेकरून जादा कापलेल्या भागाचे सर्व बाजूने फोल्डिंग म्हणजे रोल करता येईल. खिडकीला पॅक करणे, रोल केलेल्या भागावर लाकडी पट्ट्या स्क्रूने भिंतीवर किंवा फ्रेमवर फिट करावे. दाराच्या तळाचा भाग व्यवस्थितरित्या पॅक करणे व आवश्‍यकतेनुसार चिकट टेपचा वापर करावा. त्यावर सुद्धा लाकडी पट्टी स्क्रूने फिट करावी. कागद हा दार व खिडकी याला चिटकून बसेल अशा पद्धतीने लावणे. लाकडी पट्टीच्या खाली हीटलोन (एक प्रकारचे स्पंज) लावले तर अधिकची एअर टाईट होईल. 


रोगराईचे प्रमाण थांबवण्यास मदत 

सदरची उपाययोजना करूनसुद्धा घरातील आणि दुकानातील सर्व सामान काढावयाचे आहे. या सोप्या पद्धतीमुळे पुराचे पाणी घरात येऊन गेल्यानंतरची साफसफाई व रोगराईचे प्रमाण थांबवण्यास मदत होईल. ज्या ठिकाणी सर्व घरे किंवा दुकाने पाण्याखाली जात असल्यास त्याठिकाणी ही पद्धत उपयुक्त ठरणार नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hadapsar Bomb CCTV footage : हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा सीसीटीव्हीत कैद , 'महत्वाचे धागेदोरे हाती' पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

Virat Kohli Century: IPL मध्ये विराटच शतकांचा 'किंग'! KKR विरुद्ध केलेल्या १०५ धावांनी घडवला इतिहास, पाहा काय केलाय विक्रम

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

Panic Button Rule : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता प्रत्येक टॅक्सी, कॅब, बसमध्ये असणार GPS आणि पॅनिक बटण; नसेल तर परवाना होणार रद्द

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

SCROLL FOR NEXT