सातारा

पाटण तालुक्यात दवाखान्यात घुसून डॉक्‍टरांना झाली मारहाण

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि.सातारा) : तुमच्यामुळेच उपचाराअभावी रुग्ण दगावला असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी दवाखान्यात घुसून डॉक्‍टरांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.७) घडली. दुपारी साडेबाराच्या सुमारास काळगाव (ता. पाटण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या या प्रकरणी सावंतवाडी (आचरेवाडी, ता. पाटण) येथील सहा जणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
 
याबाबत पोलिसांची माहिती अशी, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास काळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसून तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश आत्माराम खबाले (वय 39) यांना सात जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी (आचरेवाडी) येथील आनंदा शंकर सावंत, तसेच अनोळखी चार पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, डॉ. खबाले दहा महिन्यांपासून काळगाव केंद्रात कार्यरत आहेत. रविवारी (ता. पाच) सावंतवाडीतील नामदेव शंकर सावंत (वय 70) हे छातीत दुखत असल्याने उपचारासाठी केंद्रात आले होते. त्या वेळी डॉ. खबाले जवळच्याच वाझोली गावात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तिकडे गेले होते. कर्मचाऱ्यांनी त्यांना कळविल्यानंतर ते केंद्रात परत आले. सावंतवाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्रात आहे. श्री. सावंत यांच्यासोबत कुणी नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाइकांना दवाखान्यात बोलावून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात पाठवले. मात्र, दरम्यानच्या काळात श्री. सावंत यांचा मृत्यू झाला.

दुपारी त्यांच्या नातेवाइकांनी काळगावच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉ. खबाले यांना त्याबाबत जाब विचारत मारहाण केली. रुग्णासोबत दिलेल्या कागदपत्रावर कोविडचा उल्लेख केल्याने त्यांना कोणत्याही रुग्णालयात घेतले नाही. तुमच्यामुळेच रुग्ण गेला असे मारहाण करणाऱ्यांचे म्हणणे होते. मारहाण करताना त्यांनी लोखंडी स्टूल फेकल्याने काच फुटून नुकसान झाले, तसेच डॉक्‍टरांना दुखापतही झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबधित मारहाण करणाऱ्यांना दवाखान्याबाहेर काढले. त्यानंतर डॉ. खबाले यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांनी आज येथे भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रवेशासाठी खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर गुन्हा, तंत्रशिक्षण संचालनालयाचा प्रवेश रद्दचा इशाराही 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT